Winter Car Care Tips: थंडी पडायला लागलीय! कार सुरु करण्याआधी या तीन गोष्टी जरूर चेक करा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 02:02 PM2021-11-28T14:02:19+5:302021-11-28T14:09:29+5:30

car care tips for Winter: थंडीमध्ये कार किंवा स्कूटर सुरु करताना चांगलीच कुरकुर करते. वेळीच लक्ष दिले नाही तर तुमच्या खिशाला भार झेलावा लागू शकतो. तुम्ही काळजी घेतच असाल परंतू ज्यांना याची माहिती नाही, किंवा नवीन आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल.

हळूहळू कडाक्याची थंडी पडू लागली आहे. दिवसा सूर्याची आग आणि रात्री कडाक्याची थंडी अशा दोन वेगवेगळ्या तापमानाशी तुम्हाला व तुमच्या कारला जुळवून घ्यावे लागते. आता धुके पडण्यासही सुरुवात होईल. अशावेळी तुमच्या कारला या थंडीशी जुळवून घेणे कठीण जाणार आहे. कार तीन- चार वर्षे जुनी असेल तर फारच कठीण असते. अशावेळी तुम्हाला कारची दररोज काळजी घ्यावी लागणार आहे.

थंडीमध्ये कार किंवा स्कूटर सुरु करताना चांगलीच कुरकुर करते. वेळीच लक्ष दिले नाही तर तुमच्या खिशाला भार झेलावा लागू शकतो. यासाठी दररोज सकाळी कार सुरु करताना काय काळजी घ्यावी याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्ही घेतच असाल परंतू ज्यांना याची माहिती नाही, किंवा नवीन आहेत त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरेल.

थंडीमध्ये बॅटरी उतरण्याच्या तक्रारी या नेहमी येत असतात. थंडीमुळे वाहने स्टार्ट होत नाहीत. कारण तापमान कमी असल्याने बॅटरी थंड पडते. यामुळे थंडीचा मौसम सुरु होण्याआधी तुम्ही बॅटरीची लाईफ उरलीय की बॅटरीची दुरुस्ती, पाणी आदी तपासणे गरजेचे आहे.

अधिकांश बॅटरींचे आयुष्य हे 3 ते 5 वर्षे असते. नवीन कार घेताना सोबत मिळालेली बॅटरी असेल तर तुम्ही तीन वर्षांनंतर बदलावी. जुनी बॅटरी झाल्याने ती ऐनवेळी धोका देते. यामुळे ही बॅटरी बदलून नवीन चांगल्या कंपनीची बॅटरी टाकावी. असे केल्यास तुम्हाला बॅटरी उतरण्याची समस्या जाणवणार नाही.

बॅटरी खराब होत असल्याचे किंवा उतरत असल्याचे संकेत तुम्हाला मिळत असतात. इंजिन सुरु करताना चावी दिली की काही आवाज करत थोडे विलंबाने इंजिन सुरु व्हायला लागले की समजावे बॅटरी प्रॉब्लेम आहे. थोड्या दिवसांनी ही बॅटरी संपणार आहे. अशावेळी बॅटरीचे पाणी तपासावे. बॅटरी मेकॅनिकला दाखवावे. त्याच्या सल्ल्यानुसार गरज असेल तर ती बदलावी.

Brakes and Suspension ची काळजी घेणे म्हणजे थेट कोणत्यातरी मोठ्या अपघाताला टाळणे आहे. थंडीच्या आधी ब्रेक आणि सस्पेन्शन तपासून घ्यावे. धुक्यामध्ये तातडीने ब्रेक लावण्याची वेळ येईल तेव्हा ब्रेकिंग सिस्टिम तुम्हाला धोका देणार नाही.

डोंगररांगा, घाट किंवा मोठ्या पल्ल्यासाठी जाणार असाल तर ब्रेक आणि सस्पेन्शन जरूर तपासावे. डोंगरांवर तीव उतार किंवा चढाव असतात. यामुळे तुम्हाला ब्रेक निट लागतो का ते पाहणे तसेच वेगात ब्रेक मारल्याने गाडीचा तोल सांभाळण्यासाठी सस्पेन्शन नीट असणे आवश्यक आहे.

थंडीच्या दिवसांत टायरची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण टायरचा थेट संबंध रस्त्याशी येतो. वेळोवेळा टायर प्रेशर चेक करा. ओबडधोबड रस्त्यांवर ब्रेकिंग होणे गरजेच असते.