Tesla चा खरा संस्थापक कोण? एलन मस्क मुळीच नाहीत...; जाणून घ्या इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:16 PM2021-09-01T13:16:15+5:302021-09-01T13:28:26+5:30

Who is Tesla company founder: अनेकांना हा इतिहास माहिती नाही, यामुळे टेस्लाचे नाव घेतले की सर्वांना एलन मस्कच डोळ्यासमोर दिसतात. ती त्यांचीच कंपनी आणि त्यांनीच स्थापन केली असे वाटते.

जगभरात प्रसिद्ध असलेली इलेक्ट्रीक कार बनविणारी टेस्ला ही कंपनी आणि आघाडीचे अब्जाधीश एलन मस्क यांना कोण ओळखत नाही. मस्क यांच्या कंपन्या वेगवेगळ्या असल्या तरी देखील त्यांचे नाव टेस्लाशी जोडले जाते. असे भासवले जाते की टेस्ला ही त्यांचीच कंपनी, त्यांनीच स्थापन केली आणि आता प्रसिद्ध झाली. परंतू ती कंपनी मूळची मस्क यांची नाही. चला जाणून घेऊया कंपनीच्या इतिहासाविषयी. (Tesla Founded in July 2003 but Elon Musk join it in 2004.)

टेस्ला नजीकच्या काळात भारतात येऊ घातली आहे. टेस्लाच्या कार भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. बंगळुरुमध्ये रिसर्च सेंटरही स्थापन झाले आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी भारतात खूपच जास्त इम्पोर्ट ड्युटी लावली जाते अशी नाराजी व्यक्त केली होती.

खरेतर टेस्ला ही कंपनी 2003 मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीचे 2003 ते 2017 या काळात Tesla Motors असे नाव होते. ती आता Tesla, Inc. नावाने ओळखली जात आहे.

टेस्ला ही वीजेवर चालणाऱ्या गाड्यांचे संशोधन आणि उत्पादन करते. टेस्लाच्या कार या बॅटरीवर चालतात. या बॅटरी बनविणे, सोलर पॅनेल आणि सोलर रुफ टाईल्स बनविणे आदी क्षेत्रात आहे.

Tesla Motors Corporation ची स्थापना 2003 मध्ये दोन अमेरिकी तंत्रज्ञांनी केली. त्यांचे नाव होते, मार्टिन इबेहार्ड (Martin Eberhard) आणि मार्क टार्पेनिंग (Marc Tarpenning). टेस्ला हे नाव एका सर्बिअन-अमेरिकन संशोधक निकोल टेस्ला (Nikola Tesla) यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. (Founded in July 2003 by Martin Eberhard and Marc Tarpenning as Tesla Motors)

टेस्ला मोटर्सला इलेक्ट्रीक स्पोर्ट कार बनवायच्या होत्या. इबेहार्ड हे टेस्लाचे सीईओ होते. तर टार्पेनिंग हे टेस्लाचे सीएफओ होते. परंतू पेपलचे (PayPal) चे सहसंस्थापक असलेल्या एलन मस्क (Elon Musk) यांनी या कंपनीला ३० दशलक्ष ड़ॉलर दान केले आणि त्या बदल्यात २००४ मध्ये ते कंपनीचे अध्यक्ष बनले.

यानंतर मस्क यांनी तिथे Martin Eberhard आणि Marc Tarpenning यांना सहाय्यक नेमले. परंतू २००७ मध्ये Eberhard यांना काढून टाकले आणि मस्क यांनी अनेक वादांनंतर सीईओ पदी वर्णी लावली. आता त्यांच्या नेतृत्वात टेस्लाने मोठी झेप घेतली आहे.

अनेकांना हा इतिहास माहिती नाही, यामुळे टेस्लाचे नाव घेतले की सर्वांना एलन मस्कच डोळ्यासमोर दिसतात. ती त्यांचीच कंपनी आणि त्यांनीच स्थापन केली असे वाटते. कारण एका वर्षातच मस्क यांनी कंपनीत पैशांच्या जोरावर वरचे पद मिळविल्याने कंपनीचे नाव होण्याआधीच मस्क यांचे नाव जोडले गेले.

यानंतर कंपनीनेही प्रसार आणि प्रचार करताना टेस्ला आणि मस्क यांचाच केला. यामुळे लोकांच्या मनावर मस्क यांचे प्रतिबिंब कोरले गेले. यामुळे टेस्लाचे नाव आले की मस्क यांचा चेहरा समोर येतो.

टॅग्स :टेस्लाTesla