भारतीय बाजारात 'या' MPV कार्स करणार धमाका!; Maruti सह 'हे' असतील पाच बेस्ट ऑप्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:13 PM2022-01-21T12:13:44+5:302022-01-21T12:24:39+5:30

2022 या वर्षात भारतात काही 3 रो एमवीव्ही (Multi-Purpose Vehicle) लाँच होणार आहेत. पाहूया कोणत्या आहेत टॉप 5 गाड्या.

Top Multi-Purpose Vehicle In India : अलीकडे भारतात 6 आणि 7 सीटर कारची मागणी खूप वाढली आहे. आजकाल बरेच खरेदीदार 3 रो SUV आणि MPVs (Multi-Purpose Vehicle) च्या शोधात आहेत.

या मोठ्या गाड्या आपल्या फॅमिलीसाठी आरामदायी ठरू शकतात. 2021 मध्ये अनेक एपीव्ही लाँच करण्यात आल्या होत्या. तसंच यावर्षी आणखी काही एपीव्ही लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पाहूया अशा काही बेस्ट पाच एपीव्ही ज्या यावर्षी लाँच होण्याची शक्यता आहे.

या यादीमध्ये किया (Kia) पासून मारुती सुझुकी (Maruti Suzuki) पर्यंत अनेक कार्सचा समावेश आहे. या कार्स या वर्षी भारतीय बाजारात दाखल होऊ शकतात. पाहूया कोणत्या आहेत या कार्स.

किआ इंडियाने नुकतीच एमपीवी कॅरेन्स (Kia Carens) लाँच केली होती. ही गाडी 2022 च्या पहल्या तिमाहीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. ही सेल्टोससोबत आपला प्लॅटफॉर्म शेअर करते, याशिवाय यामध्ये सेल्टोसप्रमाणेच इंजिन ऑप्शन्सही देण्यात आले आहेत.

यापैकी 1.5L NA पेट्रोल युनिट (115 PS/144 Nm), एक 1.4L टर्बो-पेट्रोल युनिट (140 PS/242 Nm) आणि एक 1.5L टर्बो-डिझेल युनिट (115 PS/250 Nm) यांचा समावेश आहे. ट्रान्समिशन ऑप्शन्समध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन, 7-स्पीड डीसीटी आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आलं आहे.

Renault Triber 2019 मध्ये भारतात लाँच करण्यात आली होती. तेव्हापासूनच ही कार भारतीय बाजारपेठेत यशस्वी ठरली होती. MPV सध्या फक्त 1.0-लीटर एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (72 PS/96 Nm) वर चालते. परंतु लवकरच कंपनी 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शनवर जोडण्याची योजना आखत आहे.

मारुति अर्टिगाचं अपडेटेड मॉडेल भारतीय रस्त्यांवर अनेकदा दिसली आहे. यामध्ये केवळ फ्रन्ट ग्रिलमध्ये बदल करण्यात आला आहे. परंतु एपीव्हीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये आताही 1.5L पेट्रोल इंजिन (105 PS/138 Nm) देण्यात आलं आहे. हे 5-स्पीड मॅन्युअल किंवा 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत उपलब्ध असेल.

मारुती सुझुकी भारतात XL6 चे फेसलिफ्टेड व्हेरियंट लाँच करण्याची देखील योजना करत आहे आणि त्याचे पूर्णपणे कव्हर केलेले ट्रायल मॉडेल अलीकडेच रस्त्यांवरही दिसले होते. यामध्ये फ्रन्ट डिझाईन, रिडिझाईन केलेले बंपर आणि अलॉय व्हिल्स यांचा समावेश आहे.

यामध्येही 1.5-लिटर पेट्रोल इंजिन (105 PS/138 Nm) देण्यात येणार असून त्यात कोणताही बदल नसेल आणि 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दरम्यान पर्यायासह ऑफर केले जाईल.

Toyota लवकरच भारतात Maruti Ertiga चं रीबॅज्ड वर्जन ‘Rumion’ नावानं लाँच करण्याची शक्यता आहे. टोयोटा रुमियनची यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेत विक्री सुरू करण्यात आली आहे. परंतु मार्च 2022 च्या जवळपास ही कार भारतात येण्याची शक्यता आहे. काही बाहेरील बदल सोडले तर ही कार अर्टिगा प्रमाणेच असेल आणि त्याच 1.5L पेट्रोल इंजिनवर ऑपरेट होईल.