तुमच्याकडे भारतात बनवलेले ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुम्ही 'या' 15 देशांमध्ये गाडी चालवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 02:44 PM2021-11-24T14:44:49+5:302021-11-24T15:00:44+5:30

driving license : तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे परदेशातही वाहन चालवू शकता. असे अनेक देश आहेत जिथे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. चला जाणून घेऊया त्या देशांबद्दल...

नवी दिल्ली : तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे (Indian Driving Licence) देशात वाहन चालवू शकता, परंतु तुम्हाला माहिती आहे का? की तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे परदेशातही वाहन चालवू शकता. असे अनेक देश आहेत जिथे भारताचा ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. चला जाणून घेऊया त्या देशांबद्दल...

अमेरिकेतील बहुतेक राज्ये तुम्हाला भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे भाड्याने कार चालविण्याची परवानगी देतात. तुम्ही येथे 1 वर्षासाठी गाडी चालवू शकता, परंतु तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सची कागदपत्रे योग्य आणि इंग्रजीत असली पाहिजेत.ड्रायव्हिंग लायसन्ससोबत तुम्हाला I-94 फॉर्म सोबत ठेवावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही अमेरिकेत प्रवेश केल्याची तारीख असेल.

या सुंदर देशातही तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर वर्षभर ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. दक्षिण-पश्चिम पॅसिफिक महासागरात दोन मोठी बेटे आणि इतर अनेक लहान बेटांनी बनलेल्या या देशात गाडी चालवण्याची मजा वेगळीच आहे.

जर्मनीला ऑटोमोबाईल्सचा देश म्हटले जाते, जिथे तुम्ही ड्रायव्हिंग करून उत्तम अनुभव घेऊ शकता. येथे भारतीय लायसन्सवर 6 महिने ड्रायव्हिंग करता येते. मर्सिडीज-बेंझ, ऑडी आणि बीएमडब्लू या येथील वाहन निर्मिती कंपन्या आहेत.

भारताचे शेजारी देश भूतानशी चांगले संबंध आहेत. नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशातील रस्त्यांवर तुम्ही गाडी चालवण्याचा आनंदही घेऊ शकता. या देशात भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर गाडी चालवता येते.

कॅनडाला मिनी पंजाब असेही म्हणतात. तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर तुम्ही इथल्या रुंद रस्त्यांवर गाडी चालवण्याचा आनंद घेऊ शकता. पण इथे तुम्हाला उजवीकडून गाडी चालवावी लागेल.

ऑस्ट्रेलियामध्येही तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर काही अटी व शर्तींसह ड्रायव्हिंगचा आनंद घेऊ शकता. भारतीय ड्रायव्हिंग लायसन्समुळे येथे तीन महिन्यांसाठी वाहन चालवण्याची परवानगी आहे. पण अट अशी आहे की तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत असावे.

ब्रिटनमध्ये डावीकडून गाडी चालवण्याचा नियम आहे, येथे तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर एकूण 1 वर्षासाठी गाडी चालवू शकता. Rolls Royce, Land Rover, Aston Martin सारखे प्रसिद्ध वाहन निर्मिती कंपन्या येथे आहेत.

इटली एक असा देश आहे, जिथे जगभरातील लोकांना स्पोर्ट्स कारचे वेड आहे. इथल्या रस्त्यांवर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सवर वाहन चालवण्याची संधी मिळाल्यास मजा येईल. मात्र, येथील नियमांनुसार, तुमचे लायसन्स आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिटसह असणे आवश्यक आहे.

मध्य युरोपातील हा देश ज्याला जगातील स्वर्ग म्हटले जाते. स्वित्झर्लंडमधील नियमांनुसार, तुम्ही 1 वर्षापर्यंत भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सवर कंट्री साइडमध्ये गाडी चालवू शकता. याशिवाय, तुम्ही स्वतःहून येथे वाहन भाड्याने देखील घेऊ शकता, परंतु तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत असले पाहिजे.

या देशात तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे सहज गाडी चालवू शकता. पण तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत असण्यासोबतच त्यावर तुमचा फोटो आणि स्वाक्षरी असायला हवी.

फ्रेंच इंजिनचा आनंद तुम्ही अनेकदा घेतला असेल, पण ड्रायव्हिंग लायसन्सच्या मदतीने तुम्ही फ्रान्सच्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा आनंदही घेऊ शकता. हा देश त्यांच्या अभ्यागतांना त्यांच्या स्थानिक ड्रायव्हिंग लायसन्सवर 1 वर्षापर्यंत वाहन चालवण्याची परवानगी देतो. मात्र यासोबत एक अट आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स फ्रेंच भाषेतही असावा.

जगातील प्रमुख बंदरे आणि व्यापार केंद्रांपैकी एक, हा देश दक्षिण आशियामध्ये मलेशिया आणि इंडोनेशिया दरम्यान स्थित आहे. येथील सरकार परदेशी पाहुण्यांना त्यांच्या आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्सवर 1 वर्षापर्यंत वाहन चालवण्याची परवानगी देते. हा देश जगभरातील पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. याशिवाय तुम्ही हाँगकाँग आणि मलेशियालाही गाडी चालवू शकता.