पाहा कसे मिळाले Nexon ला Globle NCAP मध्ये पाच स्टार...!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 04:31 PM2018-12-10T16:31:36+5:302018-12-10T16:54:14+5:30

ग्लोबल NCAP मध्ये भारतीय कारची क्रॅश सेफ्टी टेस्ट 2014 पासून करण्यात येते. नेक्सॉन पुढील बाजुने आदळल्यावर चालकाच्या पायांचे आणि डोक्याचे संरक्षण केले.

साईड इम्पॅक्ट क्रॅश टेस्टमध्ये नेक्सॉनने चालक आणि प्रवाशाचा बचाव चांगल्या प्रकारे केला. महत्वाचे म्हणजे नेक्सॉनमध्ये 6 एअरबॅग येतात. मात्र, एवढ्या एअरबॅग वरच्या मॉडेलमध्ये मिळतात. टेस्टसाठीची नेक्सॉन ही 2 एअरबॅगची होती.

कंपनीने काही अतिरिक्त सुरक्षा फिचर्स देताना ड्रायव्हर आणि पॅसेंजरसाठी सीटबेल्ट रिमाइंडर आणि UN95 नियमावली लागू करण्यासाठी नेक्सॉनच्या बांधणीवर काम केले आहे.

टाटाच्या नेक्सॉनला गेल्यावर्षी ग्लोबल NCAP मध्ये चार स्टार मिळाले होते. मात्र, यामध्ये कंपनीने सुधारणा करून नव्याने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने यंदाच्या क्रॅशटेस्टमध्ये या कारला 5 स्टार मिळाले आहेत. लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये या कारने तीन स्टार मिळविले आहेत.

या टेस्टसाठी काही मर्यादा असतात. टेस्टच्या करावर आदळवणारी वाहने रस्त्यावर धावणाऱ्या गाड्यांएवढी वजनाने आणि वेगातही नसतात. यामुळे वेगमर्यादा आणि दिशा ही ठराविक असते. प्रत्यक्षात समोरून येणारे वाहन वेगळ्या दिशेने किंवा वेगात येऊ शकते.

टाटाची नेक्सॉन या कारला ग्लोबल एनकॅप टेस्टमध्ये पाच पैकी पाच स्टार मिळाल्याने या कारची चर्चा होत आहे.

भारतातील किती देते हे पाहणाऱ्या ग्राहकांना त्यांची कार किती सुरक्षित आहे हे समजू लागले. ग्राहकांची मानसिकता बदलत असून सुरक्षा पुरविणाऱ्या कारकडे ग्राहक वळू लागल्याचे चित्र आहे.

नेक्सॉन ही भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार बनली आहे. या कारने गेल्या महिन्यात फोर्डच्या इकोस्पोर्टलाही विक्रीमध्ये मागे टाकले आहे.

टॅग्स :टाटाTata