2027 पर्यंत पेट्रोलवरील दुचाकींची विक्री बंद होणार? Hero ची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 10:09 AM2021-09-23T10:09:46+5:302021-09-23T10:15:54+5:30

इलेक्ट्रीक टू-व्हीलर्सबाबत लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ तयार झाली आहे. केवळ २ दिवसांत ओला स्कूटरने 1100 कोटी रुपयांच्या ईलेक्ट्रीक स्कूटर विकल्या आहेत.

इलेक्ट्रीक टू-व्हीलर्सबाबत लोकांमध्ये एक वेगळीच क्रेझ तयार झाली आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे ईव्हीना लोकांची पसंती वाढू लागली असून Ola Scooter वरून याची प्रचिती येत आहे. (give deadline of petrol two wheelers production stop by 2027.)

केवळ २ दिवसांत ओला स्कूटरने 1100 कोटी रुपयांच्या ईलेक्ट्रीक स्कूटर विकल्या आहेत. मात्र, देशातील सर्वात मोठे नाव असलेली इलेक्ट्रीक व्हेईकल कंपनीने 2027 पर्यंत पेट्रोलवरील सर्व टू-व्हीलरचे उत्पादन आणि विक्री बंद करण्याची मागणी केली आहे.

Hero Electric ने ही मागणी केली आहे. एमडी नवीन मुंजाळ (Naveen Munjal) यांनी म्हटले की, भारताला ईलेक्ट्रीक व्हेईकलचा देश बनवायचे असेल तर 2027 पर्यंत पेट्रोलवरील 2 व्हीलरची विक्री बंद करावी.

ब्लूमबर्गने त्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. नवीन वाहनांची विक्री जर का 100 टक्के ईलेक्ट्रीक वाहनांचीच करायची असेल तर 2027 हा योग्य वेळ राहिल. जर हे लक्ष्य बाजारावर सोडण्यात आले तर ते आपल्या गतीने होईल. यासाठीचा वेगही कमी असेल. यामुळे ही डेडलाईन 2027 करावी, असे मुंजाळ म्हणाले आहेत.

जर सक्तीची डेडलाईन दिली तर हीरो ईलेक्ट्रीक सारख्या कंपन्या देखील त्यांच्या स्कूटर वेगाने ईलेक्ट्रीक करतील. नाहीतर दोन्ही उत्पादने सुरुच राहतील. एकदा का ठरले की कंपन्यांना सप्लाय चेन, कामगारांना प्रशिक्षण देणे, मशीनरी आदींच्या तयारीला आणि आर्थिक तयारीसाठी काम करता येईल.

Hero Electric मार्च 2022 पर्यंत आपली पहिली ईस्कूटर घेऊन येईल. दिल्लीची ही कंपनी 700 कोटींची गुंतवणूक करणार आहे. तसेच वार्षिक उत्पादन क्षमता 5 लाख युनिट करणार आहे. भारतात ईस्कूटर पुरविताना त्या निर्यात देखील करण्याचा विचार कंपनी करत आहे.

भारतात ईलेक्ट्रीक वाहनांची खरेदी करण्याची वृत्ती चीनपासून खूप दूर आहे. याचे कारण ईव्ही महाग आहेत आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर नसणे ही आहेत. जगातील २ व्हीलर सेगमेंटमध्ये सर्वाधिक ईलेक्ट्रीक गाड्या या चीनमध्ये आहेत. हा वाटा 97 टक्के आहे.