या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 05:02 PM2018-10-03T17:02:33+5:302018-10-03T17:05:46+5:30

Maruti Suzuki Vitara Brezza या कारला नुकताच एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाली. सब कॉम्पॅक्ट एसयुव्हीमध्ये एबीएस, ड्युअल एअरबॅग आणि आयसोफिक्स सारखे सेफ्टी फिचर्स आहेत.

टाटा मोटर्सने आपल्या कारमध्ये अमुलाग्र बदल करताना सुरक्षित कार लाँच केल्या आहेत. यामध्ये टाटा झेस्टसह नेक्सॉनचा ही सहभाग आहे. मागील क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले होते. एबीएस आणि एअरबॅगला कारच्या स्टँडर्ड फिचर्समध्ये देण्यात आले आहे.

सर्वात परवडणारी कंपनी म्हणून ओळख असलेली टोयोटा कंपनीची इटियॉस ही कार सुरक्षेच्या बाबतीत काही मागे नाही. Toyota Etios Liva या कारला मागील क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळाले होते. या कारमध्येही एबीएस, इबीडी आणि एअरबॅग असणार आहेत.

Volkswagen च्या कारना दणकट आणि सुरक्षित म्हणून ओळखले जाते. पोलो च्या सर्व व्हेरिअंट्स मध्ये एबीएस आणि एअरबॅग वापरण्यात येते.