मस्तच! नवी ई-सायकल लॉन्च, एका चार्जमध्ये १०० किमी; चार्जिंग संपल्यानंतरही पळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 03:30 PM2021-04-30T15:30:52+5:302021-04-30T15:38:47+5:30

nexzu mobility electric cycle roadlark: कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक सायकल सिंगल चार्जवर सर्वात जास्त १०० किलोमीटर पर्यंत ड्रायविंग रेंज देते.

भारतात एक काळ असा होता की, सायकलचे प्रस्त मोठे होते. सायकल म्हणजे अनेकांचा जीव की प्राण होता. सायकल घरात असणे म्हणजे एक प्रकारची वेगळी श्रीमंती मानले जायचे.

मात्र, काळ बदलला, तसे सायकल मागे पडत गेली. आता पुन्हा एकदा सायकलची उपयुक्तता लोकांना जाणवू लागली असून, सायकलचा वापर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

काळानुसार, सायकलनेही कात टाकल्याचे पाहायला मिळत आहे. आता केवळ नुसती, सायकल नाही, तर ई-सायकलचा जमाना येऊ लागल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारात ई-मोबिलिटीची मागणी अधिकाधिक वाढत चालली आहे.

इलेक्ट्रिक सायकल सुद्धा मोठ्या प्रमाणात लाँच केल्या जात आहे. आज Nexzu Mobility ने भारतीय बाजारात आपली नवीन इलेक्ट्रिक सायकल Roadlark लाँच केली आहे.

आकर्षक लूक, चांगला बॅटरी पॅक आणि उत्तम मोटर या सायकलमध्ये देण्यात आला आहे. ग्राहक ही ई-सायकल कंपनीच्या अधिकृत डिलरशीपकडून तसेच वेबसाइटवरून खरेदी करू शकता येऊ शकते.

Nexzu Roadlark मध्ये कंपनी ने दोन लिथियम आयकॉन बॅटरीचा प्रयोग केला आहे. एक्सटर्नल बॅटरी पॅकची क्षमता ८.७ एएच आहे. याला सायकलवरून काढता येऊ शकते. तर फ्रेममध्ये ५.२ एएच क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे.

कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक सायकल सिंगल चार्जवर सर्वात जास्त १०० किलोमीटर पर्यंत ड्रायविंग रेंज देते. या बॅटरीला सहज घरात चार्ज केले जाऊ शकते.

यात दोन ड्रायविंग मोड्स दिले आहे. ज्यात Pedlec मोड मध्ये हे सायकल १०० किलोमीटर आणि Throttle मोड मध्ये ७५ किलोमीटर पर्यंत ड्रायविंग रेंज देते.

या ई-सायकलची बॅटरी चार्ज होण्यास फक्त ३ ते ४ तास लागतात. Nexzu Roadlark इलेक्ट्रिक सायकलच्या कंपनीने कोल्ड रोल्ड स्टिल चेचिसचा प्रयोग केला आहे.

याच्या फ्रंट मध्ये टेलेस्कोपिक फॉर्क सस्पेंशन आणि मागील भागात स्विंगआर्म सस्पेंशन दिले आहे. यात २६ इंचाचा स्पोक व्हील सोबत कॉटन ट्यूब टायर दिले आहे.

दोन्ही चाकात वेंटिलेटेड डिस्क ब्रेक्स दिले आहेत. Roadlark इलेक्ट्रिक सायकलमध्ये फ्लॅट हँडलबार आणि डिजिटल डिस्प्ले दिला आहे.

या डिस्प्ले मध्ये रायडिंग स्पीड, चार्जिंग, बॅटरी परसेंटेजची माहिती मिळते. याशिवाय LED हेडलँप सुद्धा दिले आहे. सीटला हाय डेंसिटी फोमने तयार केले आहे. ज्यात चालकाला आरामात प्रवास करता येऊ शकतो.

या सायकलला एकूण चार रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. ज्यात ब्लू, ब्लॅक, रेड आणि सिल्वर कलरचा समावेश आहे. या सायकल मध्ये कंपनीने ३६ व्हीची क्षमतेचे ब्रशलेस डीसी इलेक्ट्रिक मोटर (BLDC) चा प्रयोग केला आहे.

या सायकलची सुरुवातीची किंमत ४२ हजार रुपये आहे. या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने ड्युअल बॅटरी सिस्टमचा प्रयोग केला आहे. त्यामुळे या सायकलची ड्रायविंग रेंज जबरदस्त मिळते.

नवीन ई-सायकलमुळे ग्राहक पुन्हा एकदा सायकलकडे आकर्षित होतील. प्रदुषणामुळे इलेक्ट्रॉनिक वाहनांना सरकारकडूनही प्रोत्साहन दिले जात आहे.