New Traffic Rules: चुकून घुसलो! सगळाच रस्ता तुमच्यासाठी नसतो; थेट 20000 ची पावती फाटेल, नव्या नियमांमुळे सावध रहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 12:38 PM2022-05-20T12:38:49+5:302022-05-20T12:50:19+5:30

New Traffic Rules Fine for non motor Road: वाहन चालकांना आता खरेच सावध राहण्याची गरज आहे. कारण दंड असे आकारले जाणार आहेत की तुम्हाला एकतर वाहन विकावे लागेल किंवा सार्वजनिक वाहतूक, बस, टॅक्सी, रिक्षाने फिरावे लागणार आहे.

वाहन चालकांना आता खरेच सावध राहण्याची गरज आहे. कारण दंड असे आकारले जाणार आहेत की तुम्हाला एकतर वाहन विकावे लागेल किंवा सार्वजनिक वाहतूक, बस, टॅक्सी, रिक्षाने फिरावे लागणार आहे. हेल्मेट घातले तरी २००० रुपयांची पावती फाडली जाऊ शकते, पण तुम्हाला माहितीये का? सगळेच रस्ते तुमच्यासाठी नसतात. त्यावरून तुम्ही तुमचे वाहन नेले आणि वाहतूक पोलिसाने पकडले तर तुम्हाला २०००० रुपयांचा दंड होईल.

मोटार वाहन कायदा 115/194(1) नुसार मोटर वाहनांसाठी प्रतिबंधीत असलेल्या रस्त्यावर म्हणजेच सायकलसाठीचा रस्ता किंवा सार्वजनिक वाहनांसाठी राखीव असलेल्या रस्त्यावरून सामान्य नागरिकांनी वाहन नेले तर २०००० रुपयांची पावती फाटू शकते. अशा रस्त्यांवर कार, स्कूटर, किंवा मोटारसायकल चालविण्यास मनाई असते. याचबरोबर आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्यास देखील १०००० रुपयांचा दंड होऊ शकतो.

न्यायालयाच्या निर्देशानुसार सरकारने वाहनचालकांच्या विमा दाव्याच्या नियमातही बदल केले आहेत. नवीन नियमात असे म्हटले आहे की नियमांचे पालन न केल्याने वाहनचालक आणि त्याचा विमा उतरवणारी व्यक्ती कोणताही विमा दावा करण्यास किंवा कोणताही विम्याचा लाभ मिळविण्यास अपात्र ठरेल.

या वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनामध्ये मर्यादेपेक्षा जास्त ऑटोरिक्षा आणि दुचाकी वाहने ओव्हरलोड करणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वाहन चालवताना किंवा चालवताना मोबाईलवर बोलणे, ओव्हरस्पीड चालवणे, प्रयत्न करणे, सीट बेल्ट न लावणे यांचा समावेश आहे.

नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, आपले वाहन ओव्हरलोडेड असेल तर, आपल्याला 20000 रुपये एवढा जबरदस्त दंडही होऊ शकतो. याशिवाय असे केल्यास आपल्याला प्रति टन 2000 रुपयांचा अतिरिक्त दंडही द्यावा लागू शकतो. महत्वाचे म्हणजे असे या पूर्वीही अनेक वेळा झाले आहे.

मोटारसायकल अथवा स्कूटर चालवताना हेल्मेटची स्ट्रिप लावली नसेल, तर नियम 194D MVA नुसार आपले 1000 रुपयांचे चलान कापले जाऊ शकते. याच बरोबर, आपण सदोष हेल्मेट (BIS हॉलमार्क नसलेले) घातले असेल तर 194D MVA याच नियमानुसार आपले आणखी 1000 रुपयांचे चलानही कापले जाऊ शकते. अशा पद्धतीने हेल्मेट घातले असतानाही, आपण नियमांचे पालन केले नाही तर, आपल्याला 2000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलान स्टेटस हा पर्याय निवडा. यानंतर आपल्याला चलान क्रमांक, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) असे पर्याय दिसतील. यांपैकी वाहन नंबर हा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. यानंतर चलानचे स्टेटस आपल्या समोर येईल.

https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. यानंतर, चलानशी संबंधित आवश्यक माहिती भरा आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. यानंतर एक नवीन पान ओपन होईल. यावर चलनसंदर्भात माहिती असेल. यानंतर, आपल्याला जे चलान भरायचे आहे ते चलान शोधा. चलनासोबतच आपल्याला ऑनलाइन पेमेंटचा पर्यायही दिसेल. त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. यानंतर, पेमेंट कन्फर्म करा. यानंतर आपले ऑनलाईन चलान भरले जाईल.