मारुतीचा दिवाळी धमाका; 75 हजारपर्यंत मिळतेय सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 04:38 PM2018-10-31T16:38:57+5:302018-10-31T16:44:21+5:30

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच भारतीय वाहन उद्योगातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने त्यांच्या कारवर मोठी ऑफर देऊ केली आहे. त्यांच्या मोठ्या कारवर 75 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट कंपनीने देऊ केला आहे.

मारुती अल्टो 800 वर दिवाळीनिमित्त 45,000 रुपयांची सूट देत आहे. यामध्ये स्पेशल डिस्काऊंट आणि एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे.

अल्टो 800 पेक्षा थोडी जास्त किंमत असलेली कार अल्टो के10 वर 50 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याच्या एएमटी व्हेरिएंटवर 55,000 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. यामध्ये देखील स्पेशल डिस्काऊंट आणि एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे.

मारुती एएमटी कारनाही मोठी मागणी आहे. यामुळे सेलेरिओच्या LXi व्हेरिअंटवर 45,000 रुपये आणि ZXi व्हेरिअंटवर 55,000 आणि एएमटी व्हेरिअंटवर 60,000 रुपयांची सूट मिळत आहे. स्पेशल डिस्काऊंट आणि एक्स्चेंज बोनसचा समावेश आहे.

मारुतीचा टॉलबॉय म्हणून ओळख असणारी प्रसिद्ध कार वॅगनआरवरही मोठी ऑफर सुरु आहे. याच्या पेट्रोल मॉडेलवर 55 हजार आणि सीएनजी मॉडेलवर 60 हजार रुपयांची सूट मिळत आहे. तर एएमटी व्हर्जनवर 65 हजारांची सूट मिळत आहे.

मारुती दिवाळीनंतर अर्टिगाचे नवे मॉडेल लाँच करणार आहे. या नव्या अर्टिगामध्ये मोठे बदल असल्याने आधीचा स्टॉक संपविण्याच्या प्रयत्नात डीलर आहेत. यामुळे या अर्टिगाला मोठी सूट मिळत आहे. पेट्रोल व्हर्जनसाठी 30 हजार रुपये, सीएनजीसाठी 25,000 रुपये आणि डिझेल SHVS साठी 75,000 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे.

मारुतीची सर्वाधिक प्रसिद्ध कार स्विफ्ट नुकतीच लाँच करण्यात आली होती. या कारवरही डिस्काऊंट देण्यात येत आहे. पेट्रोलसाठी 25 हजार रुपये, डिझेलसाठी 35 हजार रुपयांची सूट मिळत आहे. यामध्ये एक्स्चेंज बोनसही मिळत आहे.