मारुतीच्या स्विफ्ट एवढी छोटी कार; पण तिची किंमत फार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 02:55 PM2019-05-09T14:55:02+5:302019-05-09T14:59:56+5:30

जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यूने भारतामध्ये त्यांची सर्वात छोटी कार लाँच केली आहे. या कारचे नाव आहे 2019 MINI John Cooper Works. 2017 मध्ये या कारची लिमिटेड एडिशन लाँच करण्यात आली होती. मात्र, केवळ 20 कार बनविण्यात आल्या होत्या.

आता Mini Cooper चा हा नवा अवतार भारतात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या नातीच्या पहिल्या वाढदिवसाला ही कार भेट दिली होती.

मीनीमध्ये 2.0 लीटरचे चार सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. जे 228 bhp ताकद देते. तसेच 320 Nm टॉर्क प्रदान करते. तसेच 0 ते 100 किमीचा वेग ही कार 6.1 सेकंदात पकडते.

भारतीय बाजारात ही कार 8 स्पीड स्पोर्ट्स स्टेप्ट्रॉनिक ऑटोमैटिक ट्रांसमिशनसोबत येते.

नव्या मीनी कुपरच्या बॉडी, स्पोर्ट ब्रेक सिस्टिमध्ये संशोधन करत बदल करण्यात आले आहेत. ही कार अपरेटेड स्प्रिंग्स, डॅम्पर्स आणि लाईटेन्ड सस्पेंशनसोबत येते.

मीनी JCW च्या डिझाईनमध्ये फार बदल करण्यात आलेले नाहीत कारच्या चेहऱ्यामध्ये आणि चाकांमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत.

नवीन अँटी रोल बार्स, लाइटवेट सपोर्ट बीयरिंग आणि ट्रिपल-पाथ स्ट्रट माउंट्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये Sport, Comfort आणि Efficiency मोड देण्यात आले आहेत.

या हॉट कारला फोक्सवॅगनची Polo GTI ही कार देऊ शकते जी या कारपेक्षा स्वस्त आहे. मीनीची किंमत 43.5 लाखांपासून सुरु होते.