आता खरेदी करता येणार नाहीत Maruti Suzukiच्या जास्त मायलेजवाल्या 'या' ७ गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 07:40 PM2020-04-21T19:40:06+5:302020-04-21T19:52:06+5:30

मारुती सुझुकी कार 'या' जास्त मायलेजसाठी ओळखल्या जातात. परंतु एप्रिलपासून कंपनीने आपल्या बर्‍याच हाय मायलेज गाड्या बंद केल्या आहेत. वास्तविक, पेट्रोल इंजिन असलेल्या कारपेक्षा डिझेल मॉडेल्स अधिक मायलेज देतात. मारुतीने बीएस 6 उत्सर्जन मानकांनुसार एप्रिल 2020 पासून डिझेल इंजिन कार बनवण्याचं थांबवत असल्याची घोषणा केली होती. मारुतीच्या जास्त मायलेज देणाऱ्या किती कार आहेत, हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत, ज्या आता आपण खरेदी करू शकणार नाही.

बीएस 6 नियमावली सुरू होण्यापूर्वी मारुतीची ही लोकप्रिय हॅचबॅक कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन या दोन्ही पर्यायात येत होती. स्विफ्ट डिझेलचे मायलेज प्रतिलिटर 28.4 किलोमीटर एवढे होते.

आता ही कार फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे, ज्याचे मायलेज 21.21 किलोमीटर प्रतिलिटर आहे. याचा अर्थ असा की, आता आपल्याला पाहिजे असल्यास आपण 7 किलोमीटर अधिक मायलेज देणारी डिझेल स्विफ्ट विकत घेऊ शकणार नाही.

स्विफ्टप्रमाणेच डिझाइरदेखील डिझेल इंजिनमध्ये येत होती, जी आता बंद करण्यात आली आहे. डिझायर डिझेलचे मायलेजदेखील 28.4 किमी प्रतिलीटर होते.

आता पेट्रोल इंजिनमध्ये येणाऱ्या डिझायरचं मायलेज 24.12 किलोमीटरपर्यंत आहे.

जास्त मायलेजमुळे एर्टिगाचे डिझेल मॉडेल जास्त लोकांच्या चांगलेच पसंतीस उतरले होते. परंतु आता आपल्याला विकत घेता येणार नाही. डिझेल इंजिन असलेल्या एर्टिगाचे मायलेज 25.47 किलोमीटर प्रतिलिटर होते.

आता ही एर्टिगा स्मार्ट-हायब्रिड पेट्रोल इंजिनमध्ये 19.01 किलोमीटर प्रतिलिटर मायलेजसह उपलब्ध आहे. एर्टिगाचं सीएनजी मॉडलही आलं असून, ज्यात मायलेज 26.08 किलोमीटर प्रतिलिटर आहे.

फेब्रुवारी 2020पर्यंत मारुती ब्रिझा ही एकमेव डिलक्स इंजिनवाली गाडी होती. त्या गाडीचे मायलेज 24.3 किलोमीटर प्रतिलिटर होते.

मारुती सुझुकीने फेब्रुवारी महिन्यात ब्रिझा फेसलिफ्ट करून पेट्रोल इंजिनसह लॉन्च केली होती, तर एसयूव्हीमध्ये डिझेल इंजिन बंद करण्यात आले होते. पेट्रोल इंजिनमध्ये ब्रिझा 18.76 किमीपर्यंतचे मायलेज देते.

मारुती बलेनोच्या डिझेल मॉडेलचे मायलेज 27.39 किमी प्रतिलीटर आहे, जे आपण आता विकत घेऊ शकणार नाही.

आता ही प्रीमियम हॅचबॅक गाडी दोन पेट्रोल इंजिनच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, एका इंजिनमध्ये 21.01 किमी प्रतिलिटर मायलेज मिळते, तर दुसऱ्या पर्यायात 23.87 किमी प्रतिलिटर मायलेज आहे.

बीएस 6 उत्सर्जन नियम लागू होण्यापूर्वी मारुती सियाझदेखील स्मार्ट हायब्रिड डिझेल इंजिनसह 28.09 किमी/ प्रतिलिटर माइलेज देत होती.

आता ही कार केवळ स्मार्ट-हायब्रिड पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे, ज्याचे मायलेज 20.65 किमी /प्रतिलिटर आहे.

मारुती सुझुकीची ही क्रॉसओव्हर एसयूव्ही फक्त डिझेल इंजिनमध्ये येत असे. त्याचे मायलेज 25.01 किलोमीटर प्रतिलिटर होते.

मारुतीने एस-क्रॉस हे डिझेल इंजिन बंद केले आहे. तसेच कंपनी लवकरच आपले पेट्रोल मॉडेल आणणार आहे.