मस्तच! आता लवकरच येतेय Mahindra Thar चे स्वस्त मॉडेल; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 07:42 PM2021-05-19T19:42:08+5:302021-05-19T19:48:05+5:30

महिंद्रा थार (mahindra thar) खरेदीचे अनेकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

कोरोना संकटामुळे अनेक उद्योगांवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. यातही ऑटोमोबाइल क्षेत्रावर त्याचा अधिक प्रभाव झाल्याचे दिसते. आता मात्र, हळूहळू हे क्षेत्र सावरताना दिसत आहे.

वाहन उद्योगात आघाडीवर असलेल्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीची अनेक वाहने गेल्या काही कालावधीपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याचे दिसत आहे.

महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ, बोलेरो, केयूव्ही ३००, टीयूव्ही ५०० यांसह अनेक कार हीट झाल्या. यात वरचा नंबर लागतो, तो म्हणजे थारचा. (mahindra thar)

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपली लोकप्रिय ऑफरोडर महिंद्रा थारचे नवीन बेस व्हेरिएंट आणणार आहे. कंपनी या कारला लोव्हर कॅपिसिटी इंजिनसोबत बाजारात आणणार आहे.

थारच्या या बेस व्हेरिएंटमध्ये १.५ लीटर, ३ सिलेंडर इंजिन मिळेल. सोबतच, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय देखील देण्यात येईल.

तसेच थारच्या या व्हेरिअंटमध्ये फोरव्हील ड्राइव्ह सिस्टिम नसेल, असे सांगितले जात आहे. यात कमी पॉवरफूल इंजिन असेल आणि हे लाइन अपचे बेस व्हेरिएंट असण्याची शक्यता असल्याने हे थारचे सर्वात स्वस्त मॉडेल असू शकते.

नवीन थारच्या किंमतीबद्दल अद्याप खुलासा झालेला नाही. थारच्या बेस व्हेरिएंटमध्ये १.५ लीटर, ३ सिलेंडर इंजिन मिळण्याची शक्यता आहे.

सोबतच, यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय देखील देण्यात येईल. काही दिवसांपूर्वीच या कारचे क्रॅश टेस्ट करण्यात आले.

ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये या कारला ४ स्टार रेटिंग मिळाली आहे. कार साइड इंपॅक्ट क्रॅश टेस्टमध्ये देखील पास झाली. महिंद्रा थारला चाइल्ड प्रोटेक्शन रेटिंगमध्ये देखील ४ स्टोर मिळाले आहेत.

अडल्ट ऑक्यूपमेंट प्रोटेक्शनसाठी कारला १७ पैकी १२.५२ पॉइंट्स मिळाले. तर चाइल्ड ऑक्युपमेंट प्रोटेक्शनमध्ये ४९ पैकी ४१.११ पॉइंट्स मिळाले आहेत.