Mahindra Atom EV: लवकरच लॉन्च होणार Mahindra ची स्वस्त इलेक्ट्रिक कार; किंमत 4 लाखांपेक्षा कमी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 05:13 PM2022-05-04T17:13:56+5:302022-05-04T17:20:03+5:30

Mahindra Atom EV: मंहिद्राची ही नवीन गाडी सिंगल चार्जमध्ये 120 KM पर्यंतची रेंज देईल.

Mahindra Atom EV: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. कंपन्यांसह ग्राहकही या वाहनांमध्ये रस घेऊ लागले आहेत. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान-मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत.

भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर प्रकार आणि ई-अल्फा मिनी टिपरसह अॅटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे.

इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारी महिंद्रा अॅटम आरामदायी आणि स्मार्ट वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. Atom सोबत, महिंद्राने इलेक्ट्रिक अल्फा टिपर देखील बाजारात आणले आहे, जे ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

ई-अल्फा मिनी टिपर 1.5 kWh बॅटरी पॅकसह आहे, जो एका चार्जवर 80 किमी पर्यंतची रेंज देतो. त्याची लोडिंग क्षमता 310 किलो आहे.

सध्या महिंद्रा अॅटम हे व्यावसायिक वाहन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे, जे वैयक्तिक वापरासाठी लॉन्च केले जाईल की नाही हे अद्याप माहित नाही.

महिंद्रा अ‍ॅटम ही लूक आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत पैसा वसूल कार आहे. या कारची किंमतदेखील खूपच कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एका अंदाजानुसार, कारची किंमत सुमारे 3 लाख रुपये असेल.

महिंद्रा अॅटमचा कमाल वेग 50 किमी/तास असेल गाडीला आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. अॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमी पर्यंत चालवता येते.

नुकतेच महिंद्राच्या या इलेक्ट्रीक गाडीचे मॉडेल पुण्यात झालेल्या अल्टरनेट फ्यूल कॉन्क्लेव 2022 मध्ये सादर करण्यात आले होते.