5 Star Gncap Rating Cars: किमया! मारुतीला जे जमले नाही ते टाटाने तिसऱ्यांदा करून दाखविले; तीन कार फाईव्ह स्टार रेटिंगच्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 03:24 PM2021-10-15T15:24:05+5:302021-10-15T15:44:31+5:30

five-star safty rating cars in India; Maruti has big Zero: भारतात आता फाईव्ह स्टार रेटिंगच्या पाच कार झाल्या आहेत. चला जाणून घेऊया भारताच्या पाच फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या कार कोणत्या...

टाटाची मायक्रो एसयुव्ही सोमवारी लाँच होणार आहे. छोटी असली तरी ती एवढी सुरक्षित असेल की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हे म्हणण्यासाठी जरी असले तरी tata punch ने खरेच ग्लोबल एनकॅप Global NCAP (Global New Car Assesment Programme) क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळविली आहे.

महत्वाची बाब म्हणजे टाटा पंचला अॅडल्ट ऑक्युपंटसाठी आणि चाईल्ड ऑक्युपंटसाठी देखील फाईव्ह स्टार रेटिंग मिळाली आहे. यामुळे टाटाच्या भात्यात आता तीन अशा कार आहेत ज्या फाईव्ह स्टार सेफ्टी प्रदान करत आहेत. टाटा नेक्सॉन, टाटा अल्ट्रॉझ या दोन कार आधीपासूनच टाटाकडे आहेत. चला जाणून घेऊया भारताच्या पाच फाईव्ह स्टार रेटिंग असलेल्या कार कोणत्या...

सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही Tata Nexon ही भारताची पहिली फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेली कार आहे. 2018 मध्ये या कारची क्रॅश टेस्ट झाली होती. या कारच्या लाँचिंगवेळी ग्लोबल एनकॅपचे सीईओ भारतात आले होते. त्यांनी भारतात येऊन थेट मारुती सुझुकीला आव्हान दिले होते. Tata Nexon सा अॅडल्टसाठी 17 पैकी 19 गुण मिळाले होते. तर चाईल्डसाठी 49 पैकी 25 गुण मिळाले होते. या कारची बॉडी स्थिर असल्याचे ग्लोबल एनकॅपने म्हटले होते.

कमी काळात सर्वाधिक लोकप्रिय झालेली प्रिमिअम हॅचबॅक कार Tata Altroz या सुरक्षित कारच्या यादीत आहे. टाटा अल्ट्रॉझ ही पहिली मेड इन इंडिया कार आहे, जिला GNCAP मध्ये 5स्टार रेटिंग मिळाली होती. अॅडल्टमध्ये 17 पैकी 16.13 आणि चाईल्डसाठी 49 पैकी 29 गुण मिळाले होते. स्थिर बांधणी आणि फुटवेल चांगले मिळते. यामध्ये डोके आणि मानेला संरक्षण मिळते. पुढील सीटवरील दोन्ही प्रवाशांच्या छातीला देखील चांगले संरक्षण मिळते.

टाटा नेक्सॉननंतर महिंद्राने देखील कॉम्पॅक्ट एसयुव्ही XUV300 ला फाईव्ह स्टार रेटिंग मिळविली होती. असे करणारी ती दुसरी भारतीय कार ठरली. अॅडल्टसाठी फाईव्ह स्टार आणि चाईल्डसाठी फोर स्टार रेटिंग मिळाले होते. GNCAP चा पहिला 'सेफर चॉइस' पुरस्कार देखील या कारला मिळाला होता.

टाटा पंचचे अधिकृत लाँचिंग 18 ऑक्टोबरला आहे. याच दिवशी किंमत जाहीर केली जाईल. परंतू पंचला फाईव्ह स्टार रेटिंग मिळाल्याचे आज जाहीर करण्यात आले. या कारची बुकिंग 21 रुपयांवर सुरु झाली आहे. अॅडल्टसाठी 16.43 आणि चाईल्डसाठी 49 पैकी 40.8 गुण मिळाले आहेत. मायक्रो एसयुव्ही सेगमेंटमध्ये पंच ही एकमेव कार आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण Honda City देखील फाईव्ह स्टार रेटिंग मिळविलेली कार आहे. या सेगमेंटमध्ये ही एकमेव कार आहे. 2020 Honda Cityला ग्लोबल नाही तर एशियन एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. सिटीमध्ये टॉप व्हेरिअंटमध्ये सहा एअरबॅग दिल्या जातात.