फक्त ५.२१ लाखांची 'ही' ७ सीटर कार, ३० दिवसांत १३ हजार लोकांनी खरेदी केली; २७ किमी माइलेज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:47 IST
1 / 9मारूती सुझुकी कंपनीने बाजारात जवळजवळ प्रत्येक सेगमेंटमध्ये आपली वाहने सादर केली आहेत. मग ती हॅचबॅक असो किंवा सेडान, एसयूव्ही, एमपीव्ही प्रत्येक श्रेणीत मारुतीच्या कार्स उपलब्ध आहेत.2 / 9देशातील व्हॅन सेगमेंटमध्ये नंबर वन कार मारूती सुझुकी ईकोने पुन्हा एकदा कमाल केली आहे. मारुती सुझुकी ईकोने मागील नोव्हेंबर महिन्यात एकूण १३ हजार २०० वाहनांची विक्री केली आहे. एक वर्षापूर्वी २०२४ मध्ये याच महिन्यात हा आकडा १० हजार ५८९ वाहन विक्रीचा होता. 3 / 9मारूती सुझुकी Ecco ला व्हॅन सेगमेंटमध्ये देशातील सर्वात स्वस्त ७ सीटर कार मानले जाते. ग्राहकांना मारूती सुझुकी इकोची ७ सीटर सोबतच ५ सीटर व्हेरिएंटही खरेदी करता येते. मारूतीच्या इको कारचे फिचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल जाणून घेऊया 4 / 9मारुती सुझुकी इकोमध्ये पॉवर स्टीअरिंग, हीटरसह एसी, ईबीडीसह एबीएस, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर अशा मूलभूत पण आवश्यक वैशिष्ट्यांसह येते. याव्यतिरिक्त, इकोमध्ये सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सहा एअरबॅग्ज सारख्या मानक सुरक्षा वैशिष्ट्यांसह देखील येते.5 / 9डिझाईनबाबत बोलायचे झाले तर इकोचा लूक खूप सिंपल आणि बॉक्सी स्टाईल आहे. मारूती इकोची साइड ग्लास, स्लाइडिंग डोअर, हाफरूफसारख्या गोष्टी दररोजचा प्रवास आणि गरजांसाठी परफेक्ट बनवते. इकोमध्ये आतील केबिनही सिंपल ठेवण्यात आली आहे. ज्याठिकाणी सीटिंग स्पेस आणि कार्गो कॅपेसिटीवर जास्त फोकस करण्यात आला आहे.6 / 9जवळपास २७ किमी माइलेज - पॉवरट्रेनबाबत इकोमध्ये १-२ लीटर पेट्रोल इंजिन मिळते, जे ८० बीपीएस पॉवर आणि १०४.४ एनएम टॉर्क देते. त्याशिवाय इको सीएनजी व्हेरिएंटमध्येही उपलब्ध आहे. इको पेट्रोल व्हेरिएंटमध्ये १९.७ किमी, सीएनजीमध्ये २६.८ किमी प्रतिकिलो माइलेज देते. मार्केटमध्ये इकोची एक्स शोरूम किंमत ५.२१ लाखपासून ६.३६ लाखापर्यंत आहे.7 / 9६ महिन्यापूर्वी देशातील सर्वात स्वस्त ७-सीटर कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी ईकोने विक्रीच्या बाबतीत दहा लाख युनिट्सचा आकडा पार केला होता. ही कार पहिल्यांदा २०१० मध्ये लॉन्च करण्यात आली होती.8 / 9जेव्हा ही कार २०१० मध्ये पहिल्यांदा लाँन्च झाली तेव्हा पहिल्या ५ युनिट्सच्या विक्रीचा आकडा ओलांडण्यासाठी जवळपास ८ वर्षे लागली. दुसरीकडे, कंपनीने पुढील ३ वर्षांत केवळ ५ लाख युनिट्सचा आकडा पूर्ण केला होता. 9 / 9विक्रीच्या बाबतीत या कारने टाटा पंच आणि ह्युंदाई क्रेटालाही मागे टाकले होते. मारुती Eeco ५-सीटर आणि ७-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये एकूण १३ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.