५० हजारच्या बजेटमध्ये स्कूटर घ्यायचा विचार करताय, या स्कूटर ठरू शकतात उत्तम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 11:38 PM2021-03-16T23:38:56+5:302021-03-16T23:42:59+5:30

Budget electric scooters : जर तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर बाजारात अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ज्यांची किंमत ५० हजारांपेक्षा कमी आहे.

जर तुमचे बजेट कमी आहे आणि तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत असाल तर बाजारात अशा दोन इलेक्ट्रिक स्कूटर आहेत ज्यांची किंमत ५० हजारांपेक्षा कमी आहे. इलेक्ट्रिक स्कूटरचे सर्वात चांगला फायदा म्हणजे तुमची महागड्या पेट्रोलपासून सुटका होईल. आता आपण जाऊन घेऊयात भारतात मिळणाऱ्या या हाय रेंज इलेक्ट्रिक स्कूटरबाबत.

या स्कूटरच्या यादीमधील पहिले नाव आहे Ampere Reo Elite चे. या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स शोरूम किंमत ४५ हजार ०९९ रुपये आहे. कंपनीच्या दाव्यानुसार सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर ५५ ते ६५ किमीपर्यंत जावू शकते. ही इलेक्ट्रिक स्कूटर लाल, पांढरा, निळा आणि काळा अशा चार रंगात उपलब्ध आहे.

या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये २५० वॉटची मोटार देण्यात आली आहे. ती एक लेड अॅसिड बॅटरीसह येते. स्कूटरचं एकूण वजन हे ८६ किलोग्रॅम आहे. Ampere Reo Elite मध्ये तुम्हाला एलईडी डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्साल यूएसबी चार्जिंग पॉईंटसारखे फिचर्स मिळतील. ही वजनाने खूप हलकी स्कूटर आहे जिचा वापर तुम्ही दैनंदिन कामांसाठी करू शकते.

यातील दुसरी स्कूटर Hero Flash La ही आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरसह हीरोचा विश्वास जोडलेला आहे. Hero Flash La ची किंमत ४२ हजार ६४० रुपये आहे. एकदा फूल चार्ज झाल्यानंतर ही स्कूटर सुमारे ५० किमीपर्यंत जाऊन येऊ शकते.

Hero Flash La चा कमाल वेग २५ किमी प्रतितास एवढा आहे. या स्कूटरची बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी ८ ते १० तास वेळ लागतो. यामध्ये BLDC हब मोटार लावण्यात आली आहे. ती २५० वॉट क्षमतेची आहे.