5000 वर्षांपूर्वीच्या लाकडापासून बनविली Bentley ने कार; किंमत ऐकून व्हाल गार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 09:50 AM2020-03-10T09:50:00+5:302020-03-10T09:55:04+5:30

बेंटले ही फोक्सवॅगनचीच उपकंपनी आहे. या प्रकारातील बेंटले केवळ 12 कारच बनविणार आहे. Bentley Mulliner Bacalar

ब्रिटनची लग्झरी कार निर्माता कंपनी बेंटलेने नवीन कार म्युलिनर बाकलरला ऑनलाईन लाँच केले आहे. या कारची खास बाब म्हणजे आतील डिझाईन हे तब्बल 5000 वर्षांपूर्वी पाडलेल्या झाड्यांच्या लाकडापासून बनविण्यात आले आहे.

बेंटले ही फोक्सवॅगनचीच उपकंपनी आहे. या प्रकारातील बेंटले केवळ 12 कारच बनविणार आहे.

कंपनी या मॉडेलला जिनिव्हा मोटर शोमध्ये लाँच करणार होती. मात्र, कोरोना व्हायरसमुळे हा ऑटो शो रद्द करण्यात आला होता. यामुळे बेंटलेने ही कार ऑनलाईन लाँच केली आहे.

या कारमध्ये फोर सिलिंडर नाही तर तब्बल 12 सिलिंडरचे इंजिन देण्यात आले आहे.

या कारमध्ये रिव्हर वूड वापरण्यात आले आहे. हे लाकूड तळे, नद्यांमध्ये 5 हजार वर्षांपासून राहिलेले असते. हे लाकूड पूर्व अँगलियामधून आणण्यात आले आहे.

या कारच्या प्रत्येक सीट क्युइलटेड पॅटर्नच्या आहेत. यासाठी जवळपास 150000 टाके घालावे लागतात.

प्रत्येक बाकलर कार ही हँडमे़ड असणार आहे. जशी ग्राहकाला हवी तशी ती बनविण्यात येणार आहे. तसेच अशाप्रकारच्या केवळ 12 कारच कंपनी बनविणार आहे.

या कारमध्ये 6 लिटरचे ट्वीन टर्बोचार्ज्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन कॉन्टिनेन्टल जीटी आणि बेटयगा एसयुव्हीमध्ये वापरले आहे.

या रुफलेस कारची किंमत 14 कोटी रुपये ठेवली आहे.

12 सिलिंडरचे इंजिन 650 हॉर्सपावरची ताकद आणि 667 एनएमचा टॉर्क तयार करते.

कार्बन फायबरचे दरवाजे आणि काही भाग हे 3D प्रिंटेड आहेत.