Wow! फक्त 36 हजारात खरेदी करा Electric Scooter, 85Km रेंज, 65kmph टॉप स्पीड; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 05:42 PM2021-12-02T17:42:56+5:302021-12-02T17:52:07+5:30

कंपनीने आजपासूनच या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंगही सुरू केली आहे. केवळ 499 रुपये भरून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करता येणार आहे.

इलेक्ट्रिक स्टार्टअप बाऊन्सने आज भारतात आपली सर्वत नवीन इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. या स्कुटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत फक्त 36,000 रुपये आहे. ही बॅटरीशिवाय स्कूटरची किंमत आहे. तसेच बॅटरीसह या स्कूटरची किंमत 68,999 रुपये एवढी आहे.

कंपनीने आजपासूनच या इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंगही सुरू केली आहे. केवळ 499 रुपये भरून ही इलेक्ट्रिक स्कूटर बुक करता येणार आहे. बाऊन्स डिसेंबरच्या मध्यापासून इन्फिनिटीची टेस्ट राइड सुरू करेल. तसेच, मार्च 2022 पासून ती ग्राहकांना ग्राहकांना सोपवली जाईल.

'बॅटरी अॅज अ सर्व्हिस' पर्याय - बाऊन्सने इन्फिनिटी 5 रंगांमध्ये सादर केली आहे. ही स्कुटर बॅटरीसह आणि बॅटरी शिवायच्या पर्यायांतही उपलब्द करून देण्यात आली आहे. 'बॅटरी अॅज अ सर्व्हिस' पर्यायात ग्राहक ही EV बिना बॅटरीचेही खरेदी करू शकतात.

या किमतीमुळे कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकी सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा निर्माण केली आहे. एवढेच नाही, तर आता बजाज चेतक इलेक्ट्रिक, TVS आयक्यूब, अथर 450X सोबतच ओला इलेक्ट्रिक स्कूटर्ससाठी हा चिंतेचा विषय आहे. कारण यांच्या किंमती बऱ्याच जास्त आहेत.

एक चार्जमध्ये 85 किमी रेन्ज - बाऊन्स इन्फिनिटीसोबत 2 किलोवॅट-आरची लिथिअम-आयर्न बॅटरी देण्यात आली आहे. जी एका चार्जमध्ये 85 किमीची रेन्ज देते. या EV चा जास्तित जास्त वेग 65 किमी/तास एवढा आहे.

बाऊन्स इन्फिनिटीमध्ये ड्रॅग मोडही देण्यात आला आहे. याचा उपयोग करून स्कूटर पंक्चर झाली तरी ती चालविली जाऊ शकते. नवी EV स्मार्ट अॅपशीही जोडली जाऊ शकते. यामुळे फिचरचा वापर करणे अत्यंत सोपे होते.

राजस्थान स्थित भिवाडी प्लांटमध्ये सुरू आहे प्रोडक्शन - कंपनीने घोषणा केली आहे, की 2021 मध्ये 22Motors चे 100 टक्के अधिग्रहण केले आहे. ते 52 कोटी रुपयांत करण्यात आले आहे. या डीलअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीने 22Motors च्या राजस्थानातील भिवाडी प्लांट आणि तेथील संपत्तीवर अधिकार मिळवला आहे.

या प्लांटमध्ये वर्षाला 1,80,000 स्कूटर्सचे उत्पादन केले जाऊ शकते. याशिवाय कंपनीने दक्षिण भारतातही आणखी एक प्लांट सुरू करण्याच्या योजनेची घोषणा केली आहे.

बाऊन्सची इन्फिनिटी इलेक्ट्रिक स्कूटर...