भारतात लाँच झाली ही पॉवरफुल Electric Car; 500kms ची ड्रायव्हिंग रेंज, 22 मिनिटांत होणार पूर्ण चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 03:39 PM2021-09-22T15:39:40+5:302021-09-22T15:46:02+5:30

Electric Vehicles च्या मार्केटमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीनं एन्ट्री घेतली आहे. कंपनी बुधवारी भारतीय बाजारपेठेत लाँच केली इलेक्ट्रीक कार.

बुधवारी भारतीय बाजारपेठेत Electric Vehicle सेगमेंटमध्ये आणखी एका दिग्गज कंपनीची एन्ट्री झाली. जर्मनीची प्रमुख वाहन उत्पादक कंपनी Audi नं भारतीय बाजारपेठेत आपली दमदार इलेक्ट्रीक कार e-tron GT लाँच केली.

आकर्षक लूक आणि जबरदस्त इंजिन क्षमता असलेली ही इलेक्ट्रीक कार S आणि RS या दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे.

Audi e-tron GT मध्ये कंपनीनं दोन इलेक्ट्रीक मोटर्सचा वापर केला आहे. याच्या S व्हेरिअंटची मोटर 469bhp ची पॉवर आणि 630Nm चा टॉर्क जनरेट करते. तर दुसरीकडे RS व्हेरिअंट 590bhp ची पॉवर आणि 830Nm चा टॉर्क जनरेट करते.

दोन्ही व्हेरिअंटमझ्ए फोर व्हिल स्टिअरिंग स्टँडर्ड म्हणून देण्यात आलं आहे. S व्हेरिअंट सिंगल चार्जमध्ये 500 किमी आणि RS व्हेरिअंट 481 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

कंपनीने या कारमध्ये अनेक उत्कृष्ट वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे, एलईडी हेडलॅम्प्सपासून 20-इंच अलॉय व्हील्स, एलईडी टेललाइट्स, 12.3-इंच पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.1-इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, प्रीमियम अपहोल्स्ट्री इत्यादींचा यात समावेश करण्यात आला आहे.

या कारमध्ये इको आणि डायनॅमिक हे दोन ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. या कारच्या S व्हेरिअंटची किंमत 1.80 कोटी रूपये आणि RS व्हेरिअंटची किंमत 2.05 कोटी रूपये एक्स शोरूम असणार आहे.

कंपनीचा दावा आहे की या कारचं एस व्हेरिएंट इतकं शक्तिशाली आहे की ते केवळ 4.1 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकतं. या कारता टॉप स्पीड 245 किमी/तास आहे.

दुसरीकडे, RS व्हेरिएंट 0 ते 100 किमी प्रतितास हा वेग केवळ 3.3 सेकंदात पकडू शकते. या कारमध्ये 250 किमी/तास इतका टॉप स्पीड देण्यात आला आहे. या कारची बॅटरी फक्त केवळ २२ मिनिटांत फुल चार्ज होत असल्याचंही सांगण्यात येत आहे.