Audi A4 चं प्रीमिअम व्हेरिअंट झालं लाँच; पाहा काय आहेत फीचर्स, किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 03:22 PM2021-12-07T15:22:34+5:302021-12-07T15:30:28+5:30

Audi A4 Premium Launched : जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं आपल्या Audi A4 चं नवं प्रीमिअम व्हर्जन लाँच केलं आहे.

जर्मनीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ऑडीनं आपल्या Audi A4 चं नवं प्रीमिअम व्हर्जन लाँच केलं आहे. पाचव्या जनरेशनच्या या नव्या Audi A4 मध्ये 2.0 लिटरचं शक्तिशाली टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.

हे इंजिन 190 bhp ची पॉवर आणि 320 Nm चा टॉर्क जनरेट करतं. इंजिन 7 स्पीड एस टॉनिक गिअरबॉक्ससह येतं असून ही कार प्रीमिअम, प्रीमिअम प्लस आणि टेक्नॉलॉजी या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

ग्राहकांना या कारमध्ये 5 एक्सटिरिअर आणि 2 इंटिरिअर कलर ऑप्शन्स मिळतात. Audi A4 प्रीमिअमची किंमत 39,99,900 रुपये एक्स शोरुम इतकी निश्चित करण्यात आलीआहे. तर Audi A4 प्रीमिअम प्लसची किंमत 43,69,000 रुपये एक्स शोरुम आणि Audi A4 टेक्नॉलॉजीची किंमत 47,61,000 रुपये एक्स शोरुम इतकी निश्चित करण्यात आलीये.

"ऑडी ए 4 ला जानेवारीमध्ये लाँच केल्यापासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ही कार ब्रॅण्डसाठी ऐतिहासिकदृष्ट्या सर्वोच्च विक्री करणारी ठरली आहे. आज आम्हाला 2021 मधील आमच्या ब्रॅण्डच्या यशाला साजरे करण्यासाठी नवीन व्हेरिएण्ट ‘ऑडी ए4’ प्रीमियम सादर करण्याचा आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों यांनी दिली.

हा आनंद साजरा करण्याचा क्षण आहे आणि आमच्या ग्राहकांना निवड करण्यासाठी तीन ट्रिम लेवल्स देत असल्यासारखा दुसरा आनंद कोणताच नाही. मला विश्वास आहे की, ही कार झपाट्याने विकसित होत असलेल्या ऑडी समूहामध्ये अधिक ग्राहकांची भर टाकेल असंही ते म्हणाले.

या कारमध्ये एलईडी हेडलाइट्ससह सिग्नेचर डेटाइम रनिंग लाइट्स, एलईडी रिअर कॉम्बीनेशन लाइट्स, ग्लास सनरूफ, ऑडी साऊंड सिस्टिम, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस, ऑडी फोनबॉक्स लाइटसह वायरलेस चार्जिंग, पार्किंग एड प्लस व रिअर व्ह्यू कॅमेरा, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, असे काही भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत.

याशिवाय यात सिंगल झोन डिलक्स ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, 25.65 सेमी सेंट्रल एमएआय टचस्क्रिन, ड्रायव्हर इन्फॉर्मेशन सिस्टिमसह कलर डिस्प्ले, अॅम्बिएन्ट लायटिंग सिंगल कलर, 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रीकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्स, अॅल्युमिनिअम एलीप्सेमध्ये इनलेज, इलेक्ट्रीकली अॅडजस्टेबल, ऑटो फोल्डिंग व हिटेड एक्स्टीरियर मिरर्ससह अॅण्टी-ग्लेअर, लेदर/लेदरेट अपहोल्स्टरी, फ्रण्ट सीट्ससाठी 4-वे लंबर सपोर्ट, फ्रेमलेस इंटीरिअर मिरर्ससोबत ऑटोमॅटिक अॅण्टी-ग्लेअर अॅक्शन, क्रूझ कंट्रोलसह स्पीड लिमिटर देण्यात आलं आहे.