Alert: कार, मोटारसायकल चालकांनो सावधान! लॉकडाऊन उघडताच गडकरींच्या मंत्रालयाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 01:01 PM2021-06-10T13:01:31+5:302021-06-10T13:07:24+5:30

Mobile phone use while driving fine: लॉकडाऊन हळूहळू उघडत आहे. आता तुम्ही तुमच्या वाहनांमधून कामानिमित्त बाहेर पडत आहात. अशावेळीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन चालकांसाठी एक इशारा जारी केला आहे.

लॉकडाऊन हळूहळू उघडत आहे. आता तुम्ही तुमच्या वाहनांमधून कामानिमित्त बाहेर पडत आहात. अशावेळीच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहन चालकांसाठी एक इशारा जारी केला आहे. (Morth Warning on mobile phone use while driving)

यामुळे जर तुमच्याकडे कार, स्कूटर, मोटरसायकल असेलत तर सावधान रहावे लागणार आहे. मंत्रालयाने हा इशारा वाहन चालक, मालकांसाठी जारी केला आहे.

जर तुम्ही चुकून नियम तोडला किंवा वेगाने वाहन चालविले तर तुम्हाला सोडले जाणार नाहीय. तुमच्यावर मोठ्या दंडाची पावती फाटू शकते. यामुळे आता वाहतूक नियमांचे पालन करावे लागणार आहे.

मंत्रालयाने वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या लोकांना इशारा देताना म्हटले आहे की, You only get 'ONE LIFE' in 'REAL WORLD' . वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नका, अपघाताची दाट शक्यता आहे.

अनेकदा आपल्याला माहिती नसते की ऑनलाईन चलन फाडण्यात आले आहे. याची सूचन एसएमएसद्वारे दिली जाते. मात्र, अनेकदा तो नंबर बंद केलेला असतो, किंवा चुकीचा असतो. E-Challan चा स्टेटस कसा पाहाल?

यासाठी आधी तुम्हाला echallan.parivahan.gov.in वर जावे लागणार आहे. यानंतर वेबसाईटवर चेक चलान स्टेटस वर क्लिक करावे लागेल.

येथे तुम्हाला चलन नंबर, वाहन नंबर आणि ड्रायव्हिंग लायसन नंबरचे पर्याय दिसणार आहेत.

यापैकी तुम्हाला वाहन नंबरच्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. येथे वाहनाचा नंबर टाकावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड भरावा लागेल.

यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक केल्यावर जर तुमच्या वाहनाला दंड आकारला गेला असेल तर त्याची पावती दिसणार आहे.

हे चलन भरण्यासाठी तुम्हाला 'Pay Now' असे दिसेल त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही ओटीपी मागवून युपीआय, एटीएम किंवा क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरू शकणार आहात.