Pallavi Jadhav: PSI पल्लवी जाधवचं 'शुभ मंगल सावधान', फोटोवर शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 03:07 PM2022-05-18T15:07:44+5:302022-05-18T15:25:05+5:30

रविवारी 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला. पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर, शुभेच्छांच वर्षाव होत आहे. (फोटो साभार- PSI पल्लवी जाधव इन्स्टा)

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या आणि ब्युटी विथ खाकीने प्रसिद्ध असलेल्या पीएसआय पल्लवी जाधव यांचं शुभ मंगल सावधान झालं आहे. सोशल मीडियातून त्यांनीचा याबाबतचे फोटो शेअर केले आहेत.

रविवारी 15 मे 2022 रोजी औरंगाबाद येथे पल्लवी जाधव आणि कुलदीप यांचा विवाहसोहळा पार पडला. पल्लवीने लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यावर, शुभेच्छांच वर्षाव होत आहे.

पल्लवी ही मुळची औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावची आहे. तिला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होते. त्यादिशेने तिचे प्रयत्न देखील सुरू होते.

आर्थिक परिस्थिची जाण असलेल्या पल्लवीनं कॉलेजचे शिक्षण आणि त्यानंतर​ एमपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. .कमवा आणि शिका​ या योजनेतून 2015 साली 80 टक्के गुण मिळवून एम ए मानसशास्त्र विषयाची पदवी मिळवली.

याच वर्षी दुसऱ्या प्रयत्नात पीएसआय परीक्षेत देखील​ यश मिळवलं. पल्लवी जाधव जालन्यातल्या महिला सुरक्षेसाठी नेमलेल्या दामिनी पथकाचं नेतृत्व करत आहे.

पल्लवी लहानपणापासूनच अभ्यासातही हुशार होती. त्यामुळे आई- वडिलांनीही तिची शिक्षणाची आवड पूर्ण करु दिली. पीएसआय बनण्यापर्यंतचा पल्लवीचा प्रवास काही सोपा नव्हता. कारण इतरांचेही टोमणे तिला त्यावेळी ऐकायला लागायचे. मात्र या कडे फार काही लक्ष न देता. पल्लवी आपल्या कामावर लक्षकेंद्रित करत गेली आणि तिला यश मिळाले.

इतरांसाठीही पल्लवी आज प्रेरणादायी बनली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपले काम करत राहणे याच गोष्टीचा पल्लवीने निर्धार केला असावा. जिद्द, मेहनत आणि चिकाटी यामुळेच आज पल्लवीचा तिच्या कुटुंबालाही अभिमान वाटतो.

सोशल मीडियावरही ती प्रचंड सक्रीय असते. आपले फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. मुळात ती दिसायला सुंदर आहे. सोशल मीडियावर तिचा प्रत्येक अंदाज तिच्या मित्र मंडळींना पसंतीस पात्र ठरतो.

पीएसआय असणाऱ्या पल्लवीला अभिनयाचीही तितकीच आवड आहे. कलेची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर आता तिचे अभिनेत्री बनण्याचेही स्वप्न पूर्ण होत आहे.

पल्लवीनं जयपूरमध्ये ग्लॅमॉन मिस इंडिया स्पर्धेत फर्स्ट रनरअप हा किताब जिंकला आहे​.​ ​लवकरच बबन चित्रपट दिग्दर्शक भाऊराव कराडे यांच्या “हैद्राबाद कस्टडी” या चित्रपटात​ नायिका​ बनून पल्लवी प्रेक्षकांसमोर येणार आहे.