वेगाचा राजा उसैन बोल्टच्या सोनेरी कारकीर्दीची चटका लावणारी अखेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 11:51 PM2017-08-18T23:51:35+5:302017-08-19T00:03:00+5:30

वेगाचा राजा उसैन बोल्टच्या सोनेरी कारकीर्दीची अखेर त्याच्या सगळ्याच चाहत्यांना चटका लावणारी ठरली.

रविवारी(दि.13) लंडनच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत बोल्ट फोर बाय हंड्रेड मीटर्स रिले या शर्यतीची फायनल पूर्णही करू शकला नाही.

बोल्टच्या डाव्या मांडीचा स्नायू अचानक दुखावल्यानं, तो रिले शर्यतीच्या अखेरच्या लॅपमध्ये कळवळून खाली कोसळला.

बोल्ट कोसळल्याने जमैकाच्या चौकडीला या शर्यतीतून पदकाविनाच माघारी परतावं लागलं.

लंडनच्या ऑलिम्पिक स्टेडियममधलं ते दृश्य जगभरच्या अॅथलेटिक्स चाहत्यांसाठी धक्कादायक ठरलं.