बाळापूरजवळ गॅस टॅँकर दुसर्‍या टॅँकरवर आदळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 08:05 PM2017-12-24T20:05:23+5:302017-12-24T20:17:11+5:30

अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला.

या आगीत टॅँकरची कॅबिन पूर्ण जळाली. सुदैवाने ही आग गॅसपर्यंत पोहचली नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

बाळापूर नगरपालिका व अकोला महानगर पालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली.

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बाळापूर शहरातून वळवली होती.