भंडारदरा परिसरातील निसर्गाचा मनोहारी अविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 01:00 PM2020-07-19T13:00:30+5:302020-07-19T13:29:14+5:30

रोहिणी, मृग पाठोपाठ आर्द्रा पुर्नवसू नक्षत्रही अधूनमधून जोरदार कोसळले. यामुळे भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात निसर्गाने जणूकाही हिरवीशाल पांघरली आहे. सध्या मुसळधार पाऊस कोसळत नसला तरी अधूनमधून येणा-या टपो-या थेंबांचा पाऊस, वा-याची झुळूक मनाला आल्हाददायक अशीच वाटते. घाटघरच्या कोकण कड्याजवळचे दृश्य तर विलोभनीय असेच आहे. कड्याच्या खाली असणारे पांढरे शुभ्र धुके, कोसळणारे लहान मोठे धबधबे वाहू लागले आहेत. मात्र मुरखेल ते घाटघरमधील डोंगररांगावरून पावसाचे प्रमाण जसे कमी अधिक होते, तसे असे विलोभनीय दृष्य येथे पहायला मिळत आहे. मात्र हे सर्व पहायला पर्यटक नाहीत. (छाया-प्रकाश महाले, राजूर/वसंत सोनवणे, भंडारदरा)

भंडारदरा पाणलोटातील ओढे वाहते झाल्याने निसर्गरम्य वातावरण निर्माण झाले आहे.(छाया-प्रकाश महाले, राजूर)

भंडारदरा येथे येणा-या पर्यटकांसाठी उभारण्यात आलेले विश्रांतीगृह.(छाया-प्रकाश महाले, राजूर)

भंडारदरा, घाटघर परिसरातील डोंगरकड्यावरील वाहणारे छोट्या धबधब्यांनी वातावरण फुलून गेले आहे. (छाया-वसंत सोनवणे, भंडारदरा)

पर्यटकांचे खास आकर्षण असलेला नेकलेस फॉल वाहता झाला आहे. (छाया-वसंत सोनवणे, भंडारदरा)

रतनवाडी येथील नान्ही फॉल पर्यटकाविना सुनासुना दिसत आहे. (छाया-वसंत सोनवणे, भंडारदरा)

दरवर्षी पर्यटकांची गर्दीे खेचणारा पांजरे धबधबा. (छाया-प्रकाश महाले, राजूर)