रेशनच्या गव्हाची बसमधून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:27 AM2020-12-05T04:27:42+5:302020-12-05T04:27:42+5:30

गंगाखेड: एसटी. महामंडळाच्या मालवाहतूक वाहनात रेशनच्या गव्हाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन ४ ...

Transportation of ration wheat by bus | रेशनच्या गव्हाची बसमधून वाहतूक

रेशनच्या गव्हाची बसमधून वाहतूक

Next

गंगाखेड: एसटी. महामंडळाच्या मालवाहतूक वाहनात रेशनच्या गव्हाची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती गंगाखेड पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन ४ डिसेंबर रोजी सकाळी परळी येथूना नांदेडकडे निघालेली मालवाहतूक बस पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर ही बस गंगाखेड पोलीस ठाण्यात जमा करीत गव्हाच्या तपासणीसाठी तहसील कार्यालयास पत्र पाठिवले आहे.

स्वस्तधान्य दुकानातील गहू, तांदूळ व अन्य धान्याचा काळा बाजार करण्यासाठी धान्य माफिया नवनव्या शक्कला लढवून स्वस्तस्तधान्याचा काळाबाजार करीत असल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे. त्यातच स्वस्तधान्य दुकानातील गव्हाची वाहतूक करण्यासाठी चक्क एस.टी. महामंडळाच्या मालवाहतूक बसचा वापर केला जात असल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास समोर आला. परळी येथील मोंढा भागातील एका व्यापाऱ्याच्या गोडावूनमधून रेशनचा गहू भरुन एसटी. महामंडळाची मालवाहतूक करणारी बस क्र. एम.एच.२०-बीएल ००६७ ही गंगाखेडमार्गे नांदेडकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. विकास कोकाटे, विशेष पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर ही बस थांबवून तपासणी केली. तेव्हा या बसमध्ये ११ क्विंटल गहू असल्याचे आढळून आले. त्यानंतर हा गहू रेशनचा आहे का, याची सतत्या पडताळणीसाठी ही मालवाहतूक बस पोलीस ठाण्यात जमा करुन या प्रकरणी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी तहसील प्रशासनाला पत्र दिले आहे. दरम्यान, एसटी. महामंडळाच्या मालवाहतूक बसमध्ये रेशनच्या गव्हाची वाहतूक होत असल्याचे समोर येताच शहरात दिवसभर चर्चा रंगली होती.

Web Title: Transportation of ration wheat by bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.