धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:45 PM2021-01-09T13:45:57+5:302021-01-09T13:49:15+5:30

800 chickens die in two days २४ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी ३४ दिवस वय असलेले हे ८०० पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते.

Shocking! 800 chickens die in two days in Parbhani district | धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमुरुंबा गावातील खरेदी- विक्रीस जिल्हाधिकाऱ्यांनी केला प्रतिबंधकुक्कुटगृहात ७ जानेवारी रोजी ३३६, तर ८ जानेवारी रोजी ४६४ कोंबड्या अचानक मरण पावल्या.

परभणी : तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांत ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या गावातील कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी- विक्री व्यवहारास प्रतिबंध घातला आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी काढण्यात आले.

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहात ७ जानेवारी रोजी ३३६, तर ८ जानेवारी रोजी ४६४ कोंबड्या अचानक मरण पावल्या. २४ ऑक्टोबर २०२० रोजी त्यांनी ३४ दिवस वय असलेले हे ८०० पक्षी हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथून खरेदी केले होते. या पक्ष्यांना लासोटा, मानमोडी, आयबीडी, मरेक्स या रोगाची लस देण्यात आली होती. कावेरी या जातीच्या असलेल्या कोंबड्या अंदाजे १.५ ते २ किलो ग्रॅम वजनाच्या असून त्यांचे वय ३.५ महिने होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर परभणी येथील पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली. मयत पक्ष्यांचे नमुने पुणे येथील अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या अनुषंगाने शुक्रवारी एक आदेश काढला आहे. त्यात सदरील कोंबड्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट नसल्याने अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी मुरुंबा येथे सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत या गावातील कुक्कुट पक्ष्यांची खरेदी- विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन अवागमनास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. मुरुंबा गाव शिवारातील ५ किमी परिसरात हा आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच मुरुंबा हे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील आदेशापर्यंत मुरुंबा गावातील अवागमन प्रतिबंधित करण्यात येत असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Shocking! 800 chickens die in two days in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.