ग्रामपंचायत निकालानंतर फरकंडा गावात राडा; पोलिसांनी केला ६५ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 01:00 PM2021-01-19T13:00:32+5:302021-01-19T13:06:25+5:30

यानंतर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर बाचाबाची झाली.

Rada in Farkanda village after Gram Panchayat result; Crime filed against 65 persons | ग्रामपंचायत निकालानंतर फरकंडा गावात राडा; पोलिसांनी केला ६५ जणांवर गुन्हा दाखल

ग्रामपंचायत निकालानंतर फरकंडा गावात राडा; पोलिसांनी केला ६५ जणांवर गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देदोन्ही गटात लाठ्याकाठ्याने एकमेकांशी तुबंळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील ८ जण जखमी झाले

पालम (परभणी ) : तालुक्यातील फरकंडा येथे ग्रामपंचायत निवडणूक वादातून दोन गटात तुबंळ हाणामारी झाल्याची घटना १८ जानेवारी रोजी रात्री ७ च्या सुमारास घडली आहे. फिर्याद देण्यास गावातील कोणीही पुढे न आल्याने सरकारी फिर्यादीवरून दोन गटातील ६५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह पोलीसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे

१८ जानेवारी रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर झाले. यात फरकंडा येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल दुपारी ३ च्या सुमारास लागला होता. यानंतर विजयी व पराभूत झालेले दोन्ही बाजूंचे समर्थक गावात गेल्यानंतर सार्वजनिक रस्त्यावर बाचाबाची झाली. याचे रूपांतर जोरदार भांडणात झाले. दोन्ही गटात लाठ्याकाठ्याने एकमेकांशी तुबंळ हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील ८ जण जखमी झाले असून पुढील उपचारासाठी त्यांना नांदेड ला हलविण्यात आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड, उपनिरीक्षक विनोद साने, जमादार बलभीम पोले, कर्मचारी गोविंद चुडावकर हे राज्य राखीव दलाच्या तुकडीसह गावात बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड यांनी गावात ठाण मांडले आहे. परिस्थिती आटोक्यात आली असून गावातून कोणीही फिर्याद दिली नाही. त्यामुळे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष बाबुराव आगळे यांच्या फिर्यादी वरून विजयी गटातील ४५ तर पराभूत गटातील २० अशा ६५ जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Rada in Farkanda village after Gram Panchayat result; Crime filed against 65 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.