परभणीत सुवर्णालंकारांची उलाढाल ५ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:59 PM2019-04-06T22:59:20+5:302019-04-06T22:59:34+5:30

साडेतीन मुहूर्तांपैकी १ मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी परभणी शहरात दागिणे खरेदीतून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थितीत सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या सराफा बाजारपेठेत शनिवारी मात्र ग्राहकांची रेलचेल पहावयास मिळाली

Parbhani's gold jewelery turnover is estimated at Rs 5 crore | परभणीत सुवर्णालंकारांची उलाढाल ५ कोटींवर

परभणीत सुवर्णालंकारांची उलाढाल ५ कोटींवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : साडेतीन मुहूर्तांपैकी १ मुहूर्त असलेल्या गुढी पाडव्याच्या दिवशी परभणी शहरात दागिणे खरेदीतून सुमारे ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. दुष्काळी परिस्थितीत सहा महिन्यांपासून ठप्प असलेल्या सराफा बाजारपेठेत शनिवारी मात्र ग्राहकांची रेलचेल पहावयास मिळाली.
मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा जिल्हाभरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नवीन वस्तुंची खरेदी करण्याची परंपरा आहे. यावर्षी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर होणाऱ्या खरेदीकडे व्यापाऱ्यांचेही लक्ष लागले होते. मात्र ग्राहकांनी परंपरेनुसार पाडव्याच्या दिवशी दागिण्यांच्या खरेदीला प्रधान्य दिल्याचे दिसत आहे. परभणी शहरातील सराफा बाजारपेठेत सकाळपासूनच ग्राहकांची रेलचेल दिसून आली. दिवसभर ही बाजारपेठ गजबजलेली होती. वेगवेगळ्या आकाराचे आणि डिझाईनचे दागिणे ग्राहकांनी खरेदी केले. मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या लहान-मोठ्या सर्वच दुकांनावर ग्राहक मोठ्या संख्येने दिसून आले. विशेषत: सायंकाळी ६ वाजेनंतर ग्राहकांची संख्या वाढल्याचे पहावयास मिळाले. महिला ग्राहक मोठ्या प्रमाणावर सायंकाळी सराफा बाजारपेठेमध्ये दाखल झाले होते. शहरातील सर्व दुकानांमध्ये मिळून सरासरी ५ ते ६ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशीच परिस्थिती तालुकास्तरावरील सराफा बाजारातही पहावयास मिळाली. एकंदर गुढी पाडव्याच्या निमित्ताने सराफा बाजारपेठेत चांगलाच उठाव निर्माण झाला होता.
अ‍ॅन्टीक ज्वेलरीला वाढली मागणीं
४मागील काही वर्षांपासून दागिणे खरेदी करताना महिलांचा ओढा तयार दागिण्यांकडे झुकत आहे. त्यामध्ये अ‍ॅन्टीक ज्वेलरी महिलांच्या पसंतीला उतरत आहे. त्यात रेडॉक्साईड ज्वेलरी, ब्लॅक आॅक्साईड ज्वेलरी, टेंपल ज्वेलरी, स्टोन ज्वेलरी या दागिण्यांच्या प्रकाराला मागणी वाढली आहे. अनेक ग्राहकांनी दागिणे घडवून घेतले आहेत. त्यामुळे या निमित्ताने बाजारपेठेत उलाढाल वाढल्याचे दिसून आले.
दुचाकी खरेदीवर ग्राहकांचा भर
परभणीत अ‍ॅटोमोबाईल्स क्षेत्रासाठी पाडव्याचा दिवस चांगला ठरला. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने या क्षेत्रात सहा महिन्यांपासून मंदीचे सावट आहे. व्यवसाय ठप्प आहे. अशा परिस्थितीत गुढी पाडव्याच्या दिवशी मात्र वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. शहरात विविध कंपन्यांचे दुचाकीचे शो-रुम आहेत. ग्राहकांनी आठ- दिवसांपूर्वीपासूनच दुचाकी वाहनांची नोंदणी करुन ठेवली होती. पाडव्याच्या दिवशी या वाहनांची खरेदी करण्यात आली. सर्वसाधारणपणे नियमित व्यवसायाच्या तुलनेत दुपटीपेक्षाही अधिक संख्येने वाहनांची विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. याशिवाय शेती उपयोगासाठी लागणाºया ट्रॅक्टरचीही खरेदी दुपटीने वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे वाहन खरेदी- विक्रीच्या क्षेत्रासाठी पाडव्याचा सण गोड ठरला आहे. दुष्काळामुळे वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय ठप्प आहे. दररोज सर्वसाधारणपणे १० ते १५ वाहनांची विक्री होते. पाडव्याच्यानिमित्ताने मात्र मुख्य विक्रेते आणि जिल्ह्यातील उपविक्रेत्यांच्या माध्यमातून १७५ ते २०० वाहनांची विक्री झाली, अशी माहिती विक्रेते किरीट शहा यांनी दिली.
लग्नसराईचा परिणाम
४यावर्षी लग्नसराई सुरु झाली आहे. त्यामुळे लग्नासाठी लागणाºया दागिण्यांचीही पाडव्याच्याच मुहूर्तावर अनेकांनी खरेदी केली. अनेक ग्राहक नोंदणी करुन दागिणे बनवून घेतात. अशा ग्राहकांनीही महिनाभरापूर्वी नोंदणी करुन पाडव्याच्या मुहूर्तावर दागिण्यांची खरेदी केली. शनिवारी खरेदीसाठी दाखल झालेल्या ग्राहकांमध्ये लग्नाचे दागिणे खरेदी करणारे, हौसेखातर दागिण्यांची खरेदी करणाºया ग्राहकांबरोबरच गुंतवणुकीच्या उद्देशाने दागिण्यांची खरेदी करणाºया ग्राहकांचाही समावेश होता.
जिल्ह्यात शनिवारी गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच या सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरण होते. घरोघरी गुढी उभारुन पूजन करण्यात आले. यानिमित्ताने मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर परभणी शहरातील बाजारपेठेत मागील काही महिन्यांच्या तुलनेत बºयापैकी उलाढाल झाली आहे. या व्यवसायावर दुष्काळाचा परिणाम जाणवत आहे. गतवर्षी पाडव्याच्या दिवशी जेवढी उलाढाल झाली होती. सर्वसाधारपणे तेवढीच उलाढाल यावर्षी झाली. त्यात वाढ झाली नाही, हे विशेष. शहरामध्ये ३१२ सराफा दुकान असून या सर्वच दुकानांवर ग्राहकांची गर्दी होती. दोन महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव ३४ हजार रुपयापर्यंत होता. तो शनिवारी ३२ हजार ८०० रुपयापर्यंत कमी झाल्याने ग्राहकांची संख्या वाढली होती.
-सचिव अंबिलवादे, अध्यक्ष सराफा असो.

Web Title: Parbhani's gold jewelery turnover is estimated at Rs 5 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.