परभणी : टँकरमुक्तीकडे शहराची वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:01 AM2020-02-24T01:01:40+5:302020-02-24T01:02:11+5:30

युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून बनविलेल्या पाणीपुरवठा योजनेवर नळ जोडणी देण्याचे काम शहरात सुरु झाल्याने आगामी काळात नळ योजनेद्वारे मूबलक पाणी मिळणार असून संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तयार केल्या जाणाऱ्या टँकरच्या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात शहराची वाटचाल टँकरमुक्तीकडे होणार आहे.

Parbhani: Towards the liberation of the city towards tanker liberation | परभणी : टँकरमुक्तीकडे शहराची वाटचाल

परभणी : टँकरमुक्तीकडे शहराची वाटचाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून बनविलेल्या पाणीपुरवठा योजनेवर नळ जोडणी देण्याचे काम शहरात सुरु झाल्याने आगामी काळात नळ योजनेद्वारे मूबलक पाणी मिळणार असून संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी तयार केल्या जाणाऱ्या टँकरच्या आराखड्याला मंजुरी मिळण्याची शक्यता मावळली आहे. परिणामी यंदाच्या उन्हाळ्यात शहराची वाटचाल टँकरमुक्तीकडे होणार आहे.
अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असून सध्या शहरवासियांना नळ जोडणी दिली जात आहे. येलदरी प्रकल्पातही मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. नव्या योजनेंतर्गत शहराच्या कानाकोपºयात जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी देणे शक्य होणार आहे. यावर्षी परभणीकरांना पाण्याचीही चिंता नाही. त्यामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्यात शहरवासियांना टँकरद्वारे पाणी देण्यापासून मनपा प्रशासनाला मुक्ती मिळणार आहे.
उन्हाळ्याची चाहूल लागताच प्रशासन संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी टंचाई कृती आराखडे तयार करण्यामध्ये मग्न असते. विंधन विहिरींची दुरुस्ती, तात्पुरती पूरक योजना, नवीन हातपंप घेणे आणि टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाते. मात्र यावर्षी नवीन योजनेच्या माध्यमातून प्रत्यक्ष नळ जोडणी दिली जाणार असल्याने या सर्व उपाययोजनांना बगल द्यावी लागणार आहे. येलदरी प्रकल्पातही पुरेसे पाणी आहे आणि शहरातही घराघरापर्यंत नळ योजना पोहचणार असल्याने टँकरला मंजुरी मिळण्याची शक्यता कमी आहे.
लाखो रुपयांचा वाचणार खर्च
४दरवर्षीच्या उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणी देण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो; परंतु, यावर्षी नळ योजनेचे पाणी उपलब्ध होणार आहे. शिवाय महानगरपालिकेकडे स्वत:चे ४ टँकर उपलब्ध आहेत. त्यामुळे गरज पडल्यास या टँकरच्या सहाय्यानेही पाणी देणे शक्य आहे.
४त्यामुळे यावर्षी टँकर्ससाठी वेगळा निधी मिळण्याची शक्यता कमी आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानेही नळ योजनेद्वारेच पाणीपुरवठा करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता कमी असून टंचाई आराखडा गुंडाळावा लागणार आहे.
जुनी जलवाहिनी होणार बंद
४परभणी शहराला सध्या राहटी येथील बंधाºयातून पाणीपुरवठा केला जात आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यास थेट येलदरीतून परभणीत पाणी येणार आहे. त्यामुळे शहरातील जुनी जलवाहिनी बंद करुन नवीन जलवाहिनीद्वारे पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक नळ धारकाला त्याचे नळ कनेक्शन नवीन योजनेमध्ये अपडेट करुन घ्यावे लागणार आहे.
४नवीन योजनेंतर्गत शहरात १५ झोन तयार केले असून त्या झोनद्वारेच पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळाली.
हातपंपांची दुरुस्तीही प्रस्तावित
४शहरातील विविध भागामध्ये ६२८ हातपंप असून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन या हातपंपाची दुरुस्ती केली जाणार आहे. मनपाच्या निधीतून दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.
२४ दलघमी पाण्याचे आरक्षण
४परभणी शहराला वर्षभर लागणाºया २४ दलघमी पाण्याचे आरक्षण येलदरी प्रकल्पात करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभरात हे पाणी शहरासाठी मिळणार आहे.
४शहरवासियांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी वर्षभरात केवळ ८ दलघमी पाण्याची आवश्यकता भासते. मात्र राहटी बंधाºयात पाणी सोडताना ते नदीवाटे येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत होता.
४हा अपव्यय गृहित धरुन सुमारे ३२ दलघमी पाणी पूर्वी आरक्षित केले जात होते. यावर्षी मात्र २४ दलघमी पाणी आरक्षित केले आहे.

Web Title: Parbhani: Towards the liberation of the city towards tanker liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.