परभणी : तीन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:16 AM2019-07-24T00:16:12+5:302019-07-24T00:17:48+5:30

शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़

Parbhani: Three MW solar power plant to be set up | परभणी : तीन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

परभणी : तीन मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी ३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे़
परभणी शहराला मुबलक पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचे काम सध्या सुरू आहे़ येलदरी येथून या योजनेसाठी पाणी घेतले असून, जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे़ मागील अनेक वर्षापासून रखडलेली ही योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे़ जलशुद्धीकरण केंद्राचे काम जवळपास पूर्ण झाले आहे़ शहरातही बहुतांश भागात जलवाहिनी अंथरण्यात आली आहे़ सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा होईल, असा विश्वास मनपाला आहे़ दरम्यान, या योजनेसाठी येलदरी येथे उद्भव विहीर बांधण्यात आली असून, धर्मापुरी जवळील जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुद्धीकरणाचे काम केले जाणार आहे़ या दोन्ही कामांसाठी एक्सप्रेस फिडरच्या अंतर्गत महापालिकेला वीज जोडणी घ्यावी लागते़ येलदरी आणि धर्मापुरी येथे चार विद्युत पंप असून, या पंपाच्या सहाय्याने २४ तास पाण्याचा उपसा केला जातो़ यासाठी मोठ्या प्रमाणात विजेची आवश्यकता भासते़ ही गरज भागविण्यासाठी पाणी पुरवठा योजनेंतर्गत वीज निर्मितीही करण्याचे धोरण शासनाने आखले आहे़ या धोरणानुसार प्रत्येक पाणीपुरवठा योजनेच्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत़ परभणी महापालिकेसाठी अमृत योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे़ यासाठी शासनाने एका संस्थेची नियुक्ती केली असून, ही संस्था हा प्रकल्प उभारण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सध्या करीत आहे़ हा डीपीआर तयार झाल्यानंतर त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असून, शासनाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे़ या प्रकल्पाची उभारणी झाल्यास महापालिकेचे पाणीपुरवठ्यासाठी लागणारे वीज बिल वाचणार आहे़
जागा निश्चितीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात
च्परभणी येथे पाणीपुरवठा योजनेंतर्गत सौर उर्जा प्रकल्प उभारला जाणार असून, त्यासाठी सध्या जागेची पाहणी केली जात आहे़ अमृत योजनेंतर्गत साधारणत: २० मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे़
च्यासाठी सुमारे २० ते २५ एकर जागेची आवश्यकता आहे़ परभणी शहराची पाणीपुरवठा योजना लक्षात घेता शहरात ३ मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे़
च्जिंतूर तालुक्यातील येलदरी आणि परभणी तालुक्यातील धर्मापुरी परिसरात जागेची पाहणी केली जात आहे़ लवकरच जागा निश्चिती झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे़
मेडा संस्थेकडे प्रकल्पाचे काम
४सौर उर्जा प्रकल्प उभारणीसाठी सध्या डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे़ हे काम शासनाच्या मेडा या संस्थेला देण्यात आले आहे़ धर्मापुरी आणि येलदरी या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे़
४सौर उर्जेच्या सहाय्याने साधारणत: ३ मेगावॅट विजेची निर्मिती करून ही वीज महावितरण कंपनीला दिली जाणार आहे
४कंपनीकडून आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा योजनेसाठी वीज घेतली जाणार आहे़ या प्रकल्पाच्या उभारणीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे़
३५ लाख रुपयांची होणार बचत
च्शहराला सध्या राहटी येथील बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे़ या पाणीपुरवठा योजनेंतर्गत राहटी येथे दोन आणि वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्रात २ असे ४ विद्युत पंप चोवीस तास कार्यरत असतात़
च्या पंपांसाठी महापालिकेला महिन्याकाठी साधारणत: ३५ लाख रुपयांचा खर्च येतो़ सध्या महापालिकेच्या स्वनिधीतून हा खर्च भागविला जात आहे़
च्नवीन पाणीपुरवठा योजनेसाठीही एवढाच खर्च अपेक्षित आहे़ सौर उर्जा प्रकल्पाची उभारणी झाल्यास ३५ लाख रुपयांचा वीज बिलापोटीच्या खर्चाची बचत होणार आहे़
सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम शासनाच्या मेडा कंपनीकडे असून, या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन वेळा परभणी शहरास भेट दिली आहे़ येलदरी, धर्मापुरी, राहटी इ. भागांतील जागा या अधिकाºयांना दाखविण्यात आल्या़ सर्वसाधारणपणे पाणीपुरवठा योजनेच्या परिसरातच जागा निश्चित केली जाणार आहे़ साधारणत: १५ एकर जागेची आवश्यकता आहे़ येलदरी येथे पाटबंधारे विभागाची जागा असून, या जागेचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन त्या ठिकाणी प्रकल्प उभारला जाईल़ या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेच्या वीज बिलावर होणाºया खर्चाची बचत होणार आहे़
-रमेश पवार, आयुक्त, महानगरपालिका, परभणी

Web Title: Parbhani: Three MW solar power plant to be set up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.