परभणी : वर्षभरात आगीच्या ८७ घटना घडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:13 AM2020-02-23T00:13:49+5:302020-02-23T00:14:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : शहरात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत आगीच्या ८७ घटना घडल्या असून, यात रेस्क्युकॉलची ...

Parbhani: There were 2 fire incidents in the year | परभणी : वर्षभरात आगीच्या ८७ घटना घडल्या

परभणी : वर्षभरात आगीच्या ८७ घटना घडल्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात जानेवारी ते डिसेंबर २०१९ या कालावधीत आगीच्या ८७ घटना घडल्या असून, यात रेस्क्युकॉलची संख्या आठवर राहिली आहे. जिवाची बाजी लावत मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या आगी नियंत्रणात आणल्या आहेत.
परभणी शहरामध्ये लोकसंख्येनुसार व सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २ अग्निशमन कार्यालयांची तसेच ४ वाहनांची आवश्यकता आहे; परंतु, सद्य:स्थितीत शहरात एकच कार्यालय कार्यरत आहे. येथे २ अग्निरोधक वाहन, १ फोम टेंडर (गॅसेस, लिक्वीड आग विझविण्यासाठी) कार्यरत आहे. शहराची सुरक्षा ही ५ फायरमन, ५ वाहनचालकावर आहे; परंतु, सध्या नियुक्त असलेली कर्मचारी व वाहनांची संख्या ही अपुरी आहे़ विस्ताराने वाढलेल्या परभणी शहराची सुरक्षितता व आगीच्या घटना रोखण्यासाठी २१ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे़; परंतु, सद्यस्थितीत अग्निशमन दलाच्या कार्यालयात कर्मचाºयांची संख्या अपुरी आहे. आगीची वृद्धी (कॉल) अथवा रेस्क्युकॉल आल्यास कार्यालयाचे वाहन तातडीने घटनास्थळी पोहोचते. आगीची माहिती मिळताच वाहनासोबत पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे दोन किंवा तीन कर्मचारी जातात. नियमानुसार आगीच्या येणाºया कॉलवर किमान ६ फायरमन असणे गरजेचे आहे. कॉलवर जाणाºया सहा जणांमध्ये लिडींग फायरमन (मुखिया) व एका वाहनालकाचा समावेश असतो. २०१९-२० वर्षात जानेवारी महिन्यात आगच्या ७ घटना घडल्या होत्या तर रेस्क्यू कॉलची संख्या १ होती. फेब्रुवारीमध्ये आगीच्या ३ घडल्या तर रेस्क्यू कॉलची संख्या १ होती. मार्चमध्ये आगीच्या १२ घटना घडल्या. एप्रिलमध्ये १३, मे महिन्यात १३, जूनमध्ये १४ तर रेस्क्यू कॉलची संख्या १ होती. जुलै महिन्यात आगीच्या ६ घटना घडल्या तर रेस्क्यू कॉलची संख्या ४ होती. आॅगस्टमध्ये एकही घटना घडली नाही; परंतु, या महिन्यात रेस्क्यू कॉलची संख्या १ होती. सप्टेंबरमध्ये आगीची १ घटना घडली होती. आॅक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात आगीच्या एकूण ६ घटना घडल्या तर डिसेंबर महिन्यात आगीच्या ४ घडल्या घडल्या होत्या.

Web Title: Parbhani: There were 2 fire incidents in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.