परभणी : भेदभाव विसरुन लोकशाही बळकट करा-नवाब मलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:45 AM2020-01-28T00:45:04+5:302020-01-28T00:45:39+5:30

जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने अग्रेसर रहावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली तर लोकशाही बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.

Parbhani: Strengthen democracy by forgetting discrimination - Nawab Malik | परभणी : भेदभाव विसरुन लोकशाही बळकट करा-नवाब मलिक

परभणी : भेदभाव विसरुन लोकशाही बळकट करा-नवाब मलिक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :जात, धर्म, वंश, लिंग हे सर्व भेदभाव विसरुन सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने अग्रेसर रहावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली तर लोकशाही बळकट होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री नवाब मलिक यांनी केले.
येथील स्टेडियम मैदानावर रविवारी प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते ध्जारोहण करण्यात आले. या प्रसंगी जि. प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर, महापौर अनिता सोनकांबळे, खा.बंडू जाधव, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.डॉ.राहुल पाटील, आ.सुरेश वरपूडकर, आ.मेघना बोर्डीकर, प्रभारी जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज, पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, मनपा आयुक्त रमेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका यांनी परेड संचलनातून मानवंदना दिली. तसेच आरोग्य, कृषी, स्वच्छ भारत मिशन, महानगरपालिका, शिक्षण, कुष्ठरोग निर्मूलन, महिला व बालविकास विभाग आदींनी देखाव्यावर आधारित चित्ररथ सादर केले.
पालकमंत्री मलिक यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, शहिदांच्या वीरमाता, वीरपत्नी आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर, शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Parbhani: Strengthen democracy by forgetting discrimination - Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.