Parbhani: Seven crore for Shravanbala Yojana | परभणी : श्रावणबाळ योजनेसाठी सव्वा सात कोटी
परभणी : श्रावणबाळ योजनेसाठी सव्वा सात कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यातील श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेतील लाभार्थ्यांच्या पाच महिन्यांच्या वेतनापोटी शासनाने ७ कोटी ३२ लाख ८३ हजार ५९० रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे़
राज्यातील निराधार ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेंतर्गत प्रतिमाह अनुदान वितरित केले जाते़ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून या योजनेंतर्गत निराधार ज्येष्ठ नागरिकांची नोंद घेवून या नागरिकांना प्रतिमाह अनुदानाचे वितरण केले जाते़
श्रावणबाळ योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये बाधा येऊ नये, ते नियमित वितरित व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने आॅक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२० या पाच महिन्यांच्या अनुदानाची तरतूद केली आहे़
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या संदर्भात ७ नोव्हेंबर रोजी एक अध्यादेश जारी केला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानापोटी परभणी जिल्ह्याला ५ कोटी ३२ लाख १ हजार ७७० रुपये मंजूर करण्यात आले आहेत़ हे अनुदान जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे़
परभणी जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३६ हजार १७ लाभार्थी असून, या लाभार्थ्यांच्या वेतनापोटी प्रत्येक महिन्याला १ कोटी ६ लाख ४० हजार ३५४ रुपयांची आवश्यकता असते़ राज्य शासनाने ५ महिन्यांचे अनुदान जमा केल्याने निवृत्ती वेतनधारकांचा आगामी काळातील वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे़
अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनाही अनुदान
४याच योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाने आॅक्टोबर ते फेब्रुवारी या पाच महिन्यांचे अनुदान मंजूर केल आहे़ जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांची संख्या ६ हजार ४७ एवढी आहे़
४या लाभार्थ्यांना वेतनापोटी प्रतिमाह ४० लाख १६ हजार ३६४ रुपयांची आवश्यकता लागते़ त्यानुसार पाच महिन्यांसाठी २ कोटी ८१ हजार ८२० रुपये जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत़

Web Title: Parbhani: Seven crore for Shravanbala Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.