परभणी : १० टन कचऱ्यातून वीज निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:13 AM2020-01-08T00:13:51+5:302020-01-08T00:14:53+5:30

शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बोरवंड येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पातून सुमारे ५०० किलो वॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. ही वीज याच ठिकाणी असलेल्या इतर प्रकल्पांसाठी आणि प्रकाश व्यवस्थेसाठी वापरण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्रयस्थ समितीच्या तपासणीनंतर प्रत्यक्षात प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

Parbhani: Power generation from 3 tonnes of waste | परभणी : १० टन कचऱ्यातून वीज निर्मिती

परभणी : १० टन कचऱ्यातून वीज निर्मिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील कचºयाची योग्य विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने बोरवंड येथे १० मेट्रिक टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला असून या प्रकल्पातून सुमारे ५०० किलो वॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. ही वीज याच ठिकाणी असलेल्या इतर प्रकल्पांसाठी आणि प्रकाश व्यवस्थेसाठी वापरण्यात येणार आहे. सध्या हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्रयस्थ समितीच्या तपासणीनंतर प्रत्यक्षात प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
परभणी शहरामध्ये दिवसाकाठी ११० मेट्रिक टन कचºयाची निर्मिती होते. या कचºयाचे करायचे काय? असा प्रश्न महानगरपालिकेसमोर होता. सद्यस्थितीला परभणी शहराजवळ असलेल्या धाररोडवरील कचरा डेपोमध्ये हा कचरा साठविला जात आहे. त्यातून कमी-अधिक प्रमाणात खताची निर्मिती होत असली तरी प्रत्यक्षात सर्व कचºयाचा विनियोग होत नाही. शिवाय शहराची लोकसंख्या वाढत असून या भागात नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत.
शहरातील कचºयाचे विघटन करुन त्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने वर्षभरापूर्वी महानगरपालिकेला १८ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मंजूर झाला. शहरापासून १० ते १२ कि.मी.अंतरावर असलेल्या बोरवंड येथे महानगरपालिकेने या प्रकल्पाची उभारणी केली आहे. त्यात ५ मेट्रिक टनचे दोन बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या बायोगॅससाठी ओल्या कचºयाची आवश्यकता भासते. शहरात जमा होणाºया कचºयापैकी ४० टन ओला कचरा असून त्यातून दररोज १० टन कचरा बायोगॅस प्रकल्पाला वापरला जाणार आहे. या माध्यमातून सुमारे ५०० किलो वॅट विजेची निर्मिती होणार आहे.
ही वीज याच प्रकल्पाच्या स्थळी असणाºया इतर छोट्या-मोठ्या प्रकल्पांना वापरली जाणार आहे. तसेच बोरवंड परिसरातील प्रकाश व्यवस्थेसाठीही या विजेचा वापर होणार आहे. हा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला असून पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समितीने प्रकल्पाची तपासणी केल्यानंतर प्रत्यक्षात तो कार्यान्वित होणार आहे.
राज्यात प्रथमच एफएसटीपी प्रकल्पाची उभारणी
४शौचालयाच्या मैल्याचे शास्त्रोक्त विघटन करण्यासाठी महानगरपालिकेने बोरवंड येथेच एफएसटीपी या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प देखील अंतिम टप्प्यात असून येत्या आठ दिवसांत काम पूर्ण होणार आहे. शहरात शौचालयाचा निर्माण होणार मैल्यावर शास्त्रीयदृष्टीने प्रक्रिया करुन त्यापासून सोनखताची निर्मिती केली जाणार आहे. २० केएलडी क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यासाठी दररोज २० हजार लिटर मैला लागणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा शासनाकडून प्राप्त झाला असून हे कामही अंतिम टप्प्यात आहे.
खताचीही होणार निर्मिती
४शहरात दररोज होणाºया ४० टन ओल्या कचºयापैकी १० टन कचºयामधून वीज निर्मिती होणार असून उर्वरित ३० टन कचºयातून खताची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पीट कंपोस्टिंग आणि विंडरो कंपोस्टिंग हे दोन प्रकल्प या भागात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून ओल्या कचºयाचे विघटीकरण करुन खताची निर्मिती केली जाणार आहे. या दोन्ही प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत.

Web Title: Parbhani: Power generation from 3 tonnes of waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.