परभणी :पोलिसांच्या जीपला अपघात, दोन कर्मचारी झाले जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:37 PM2019-04-12T23:37:52+5:302019-04-12T23:38:15+5:30

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या जीपला इंडिका कारने धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.

Parbhani: Police jeep injured and two employees injured | परभणी :पोलिसांच्या जीपला अपघात, दोन कर्मचारी झाले जखमी

परभणी :पोलिसांच्या जीपला अपघात, दोन कर्मचारी झाले जखमी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांच्या जीपला इंडिका कारने धडक दिल्याने पोलीस निरीक्षकांसह दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी दुपारी पावणेदोन वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवसेना- भाजप युतीचे उमेदवार खा.बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आयोजित केली होती. या सभेसाठी पाथरी पोलीस ठाण्याची जीप (क्र.एम.एच.२२/डी ७२२३) पेट्रोलिंगसाठी सभास्थळापासून मोंढा परिसरातील रस्त्याने यु टर्न घेत असताना माजलगावकडून पाथरीकडे येणाऱ्या इंडिका कारने (एम.एच.१६/एटी १५६५) जीपला जोराची धडक दिली. या अपघातात पोलीस निरीक्षक डी.डी. शिंदे, कर्मचारी सम्राट कोरडे, जीप चालक रघुनाथ जाधव यांना मार लागला आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

Web Title: Parbhani: Police jeep injured and two employees injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.