परभणी : न्याय मंदिराचे पावित्र्य राखून सर्वांना न्याय द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:14 AM2020-01-13T00:14:29+5:302020-01-13T00:14:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पालम ( परभणी ): कायदा सर्वांसाठी समान आहे. कितीही मोठा व्यक्ती असला तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून ...

Parbhani: Justice should be kept in the sanctity of the temple of justice | परभणी : न्याय मंदिराचे पावित्र्य राखून सर्वांना न्याय द्यावा

परभणी : न्याय मंदिराचे पावित्र्य राखून सर्वांना न्याय द्यावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): कायदा सर्वांसाठी समान आहे. कितीही मोठा व्यक्ती असला तरीही तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. न्यायव्यवस्थेत प्रत्येकाला न्याय मिळावा व घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे वकिलांनी न्याय भावनेतून न्याय मंदिराचे पावित्र्य राखत न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एच.एस. महाजन यांनी केले.
११ जानेवारी रोजी पालम दिवाणी न्यायालय (कनिष्ठस्तर) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन पालम शहरातील जायकवाडी वसाहत परिसरात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती राजेंद्र जी. अवचट यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पालम दिवाणी न्यायालयाचे न्यायधीश एस.एन. पाटील, पालम वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. डी. जाधव, न्यायाधीश वाय.एम. तिवारी, गंगाखेड वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड.पी.बी. मंदोडे, पूर्णा वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड. आर. बी. चव्हाण, सोनपेठ वकील संघाचे अ‍ॅड. तात्या यादव, नगराध्यक्षा अनिताताई हत्तीअंबिरे, उपनगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, सभापती अ‍ॅड. विजयकुमार शिंदे, शंकरराव वाघमारे, हिदायतुल्ला खान, अ‍ॅड. शहाजी घाटोळ, अ‍ॅड. अब्दुल गफार, अ‍ॅड. गोविंद पैके, अ‍ॅड. संतोषराव मुंडे, एल.एस. डहाळे, प्रभाकर सिरस्कर, अ‍ॅड. मिलिंद क्षीरसागर, अ‍ॅड. राम गायकवाड, अ‍ॅड. श्याम रोकडे, अ‍ॅड. कुलकर्णी, अ‍ॅड. आर. डी. दुधाटे, अ‍ॅड. हनुमंत जाधव, अ‍ॅड. बी. आर. लोखंडे, अ‍ॅड. पी.बी. मुठाळ, अ‍ॅड. कुकडे, अ‍ॅड. संतोष मुंडे, अ‍ॅड. तुकाराम पौळ, अ‍ॅड. उद्धव सिरस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिखेवाड, उपअभियंता केदार सोनवने, मजिद अन्सारी, लाल खान पठाण, अ‍ॅड. दराडे आदींसह गंगाखेड, पालम, पूर्णा व सोनपेठ तालुक्यातील न्यायमूर्ती, वकील, न्यायालयीन कर्मचारी यांच्यासह पालम शहरातील नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अ‍ॅड. व्ही. डी. जाधव यांनी तर सूत्रसंचालन हरीश फड यांनी केले. न्यायमूर्ती एस.एन. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Parbhani: Justice should be kept in the sanctity of the temple of justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.