Parbhani: Hours against EVMs | परभणी : ईव्हीएम विरोधात घंटानाद
परभणी : ईव्हीएम विरोधात घंटानाद

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या विरोधात भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना, एमआयएम यांच्या वतीने १७ जून रोजी जिल्हाभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले़
सर्वसामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास राहिला नाही. अनेक विकसित देशांमध्ये ईव्हीएमवर बंदी घालण्यात आली असून मतपत्रिकेद्वारेच मतदान घेतले जात आहे. त्यामुळे ईव्हीएमला भारतातून हद्दपार करण्यासाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात १७ जून रोजी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’ या विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच प्रत्येक तहसील कार्यालयासमोर घंटानाद करण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार भारिपच्या वतीन सोमवारी दुपारी १२ वाजता हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएम विरोधात घोषणा दिल्या. तसेच प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण कनकुटे, आलमगीर खान आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़
गंगाखेडात प्रतिकात्मक मतदान यंत्र जाळले
च्गंगाखेड- ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करीत प्रतिकात्मक ईव्हीएम मतदान यंत्र कार्यकर्त्यांनी जाळले़
च्गंगाखेड येथे सकाळी ११ च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर जमले़ त्यांनी ईव्हीएम मतदान यंत्राच्या विरोधात घोषणाबाजी केली़ त्यानंतर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ त्यानंतर प्रतिकात्मक ईव्हीएम मशीन जाळण्यात आली़ तसेच आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला़
च्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष वामनराव राठोड, भारिपचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे, सय्यद रुस्तम, संदीप भालेराव, अनिलसिंह चव्हाण, गोविंदराव वैद्य, भगवान देवरे, रमेश पैठणे, निवृत्ती केदार, बाबासाहेब गायकवाड, अंकुश पैठणे, प्रकाश भालेराव, राजभाऊ पैठणे, सुनील पवार, संदीप फड आदींची उपस्थिती होती़
पाथरीत कार्यकर्र्त्यांनी केली घोषणाबाजी
च्पाथरी : ईव्हीएम विरोधात पाथरी येथे भारिप बहुजन महासंघाच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात फेर निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली़
च्प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर तालुकाध्यक्ष अ‍ॅड़ अशोक पोटभरे, दिलीप ढवळे, मुजीब आलम, अंगद वाघमारे, राजकुमार गायकवाड, श्याम ढवळे, आवडाजी ढवळे, मुंजाजी साळवे आदींची नावे होती़
पालम शहरामध्ये आंदोलन
पालम- येथील तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी, लालसेना व एमआयएमच्या वतीने १७ जून रोजी पालम तहसील कार्यालयासमोर शहरातील कार्यकर्त्यांनी सकाळी ११ वाजता धरणे धरले. त्यानंतर घंटानाद करून ईव्हीएमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने नायब तहसीलदार श्रीरंग कदम यांना निवेदन देऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात अरविंद थिटे, कैलास झुंजारे, अमोल कदम, राहुल शिंदे, गौतम हनवते, दयानंद हाके, भीमराव रायबोले, रावसाहेब वावळे, जय हनवते, प्रकाश गालफाडे, सुमेध वाघमारे आदीसह कार्यकर्ते मोठा सहभागी झाले होते.
मानवतमध्ये तहसीलदारांना निवेदन
मानवत : येथील तहसील कार्यालयासमोर भारिप बहुजन महासंघाच्या वतीने १७ जून रोजी दुपारी १ वाजता घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार डी.डी. फुफाटे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात दीपक ठेंगे, भारती लाटे, वैशाली सोनावणे, आशा कुमावत, श्रीरंग पंडित, कार्तिक मुजमुले, भीमराव तुपसमिंद्रे, राज एडके, नागसेन भदर्गे, तुकाराम लांडगे, नंदू लांडगे, प्रकाश खंदारे, कोंडिबा गायकवाड आदी सहभागी झाले होते.


Web Title: Parbhani: Hours against EVMs
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.