परभणी : मासोळी प्रकल्पाने गाठली पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:17 AM2019-09-18T00:17:07+5:302019-09-18T00:21:00+5:30

तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Parbhani: Fifty-five reached by the fish project | परभणी : मासोळी प्रकल्पाने गाठली पन्नाशी

परभणी : मासोळी प्रकल्पाने गाठली पन्नाशी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): तालुक्यातील डोंगरी भागात असलेल्या मासोळी प्रकल्पाने चार वर्षानंतर पन्नाशी गाठल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गावातील व गंगाखेड शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गंगाखेड तालुक्यात असलेल्या डोंगर भागातील ४०० एकर जमिनीवर १९७२ सालच्या दुष्काळात उभारण्यात आलेला मासोळी प्रकल्प गेल्या चार वर्षात अत्यल्प प्रमाणात झालेल्या पर्जन्यमानामुळे कोरडाच राहिला होता.
गतवर्षी १७ सप्टेंबर २०१८ रोजी या प्रकल्पात केवळ ९ टक्केच एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. डिसेंबर २०१८ च्या अखेरीस हा प्रकल्प मृतसाठ्यात गेल्याने चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत या मृतसाठ्यातील पाण्यावरच गंगाखेड शहर व परिसरातील गावांची तहान भागविण्यात आली. चालू वर्षात आॅगस्ट महिन्याच्या अखेरच्या दोन दिवसात व सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी तालुका व परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे तसेच अधूनमधून कोसळत असलेल्या पावसाच्या सरीमुुळे मासोळी प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता मासोळी प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला.
मासोळी प्रकल्पाने पन्नाशी ओलांडल्याने परिसरातील माखणी, खोकलेवाडी, सुप्पा, इसाद, सिरसम आदी गावांसह गंगाखेड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्याच बरोबर मासोळी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाण्याचा सिंचनासाठी मोठा फायदा होणार असल्याने परिसरातील शेतकरी समाधानी झाले आहेत. आगामी काळात डोंगर भागातील कोद्री, बडवणी, डोंगरजवळा, पिंपळदरी, सुप्पा आदी भागात दमदार पाऊस झाल्यास मासोळी प्रकल्प १०० टक्के भरेल, असा आशावाद मासोळी प्रकल्पात कार्यरत अधिकारी व परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
२०१६ मध्ये भरभरून वाहिला प्रकल्प
च्२०१७- १८ मध्ये पावसाने उघडीप दिल्याने मासोळी प्रकल्पात पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१७ पासून या प्रकल्पात केवळ १४ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. २०१७ पेक्षाही भयावह परिस्थिती २०१८ मध्ये तालुक्यात निर्माण झाली. त्यामुळे १७ सप्टेंबर २०१८ मध्ये प्रकल्पाच्या पाण्यात घट होऊन केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला. २०१८ च्या डिसेंबर अखेरीस मासोळी प्रकल्पाने तळ गाठत हा प्रकल्प मृतसाठ्यात गेला.
च्उपलब्ध असलेल्या मृतसाठ्यातील पाण्यावरच तालुक्यातील काही गावांची व गंगाखेड शहराची आॅगस्ट महिन्यापर्यंत तहान भागविण्यात आली. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत सुरू झालेल्या पावसामुळे आज रोजी या प्रकल्पात ५० टक्के पाणीसाठा झाल्याने शेतकरी व आणि नागरिंकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान चार वर्षांच्या कालावधीत २०१६ मध्येच हा मासोळी प्रकल्प १०० टक्के भरला होता.

Web Title: Parbhani: Fifty-five reached by the fish project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.