परभणी : तोतया पोलिसाने पळविली शेतकऱ्याची दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:15 AM2019-10-15T00:15:44+5:302019-10-15T00:16:32+5:30

पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने शेतकºयाची दुचाकी पळवून नेल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी पालम तालुक्यातील रोकडेवाडी ते रावराजूर या रस्त्यावर घडली आहे़

Parbhani: Farmer's bike driven by impersonation police | परभणी : तोतया पोलिसाने पळविली शेतकऱ्याची दुचाकी

परभणी : तोतया पोलिसाने पळविली शेतकऱ्याची दुचाकी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगााखेड (परभणी): पोलीस असल्याची बतावणी करून एका भामट्याने शेतकºयाची दुचाकी पळवून नेल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी पालम तालुक्यातील रोकडेवाडी ते रावराजूर या रस्त्यावर घडली आहे़
पालम तालुक्यातील रावराजूर येथील रामेश्वर सटवाजी उराडे हे १२ आॅक्टोबर रोजी नवीनच विकत घेतलेली दुचाकी गाडी घेवून पासिंग करण्यासाठी परभणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आले होते़ येथून गावाकडे परत जात असताना सायंकाळी ५़३० वाजेच्या सुमारास रोकडेवाडी ते रावराजूर या कच्च्या रस्त्यावर पांढरा टी-शर्ट, मिल्ट्री पँट तसेच काळा बुट परिधान करून एका व्यक्तीने रामेश्वर उराडे यांना थांबविले़ त्यानंतर दुचाकीच्या लायसनची मागणी त्यांच्याकडे केली़ पोलीस असल्याचे सांगत या व्यक्तीने मरडसगावपर्यंत सोडण्याची विनंती उराडे यांना केली़ त्यानंतर या व्यक्तीने दुचाकी स्वत:च्या ताब्यात घेतली आणि मरडसगावकडे पळ काढला़ रामेश्वर उराडे यांनी दुसºया दुचाकीवरून त्याचा पाठलाग केला़ परंतु, तो मिळून आला नाही़ या व्यक्तीच्या हालचालीवरून संशय आला़ त्यामुळे रावराजूर गावात चौकशी केली असता, सदर व्यक्ती हा राम वैजनाथ पवार (रा़ जनाईनगर, गंगाखेड) हा असल्याची माहिती उराडे यांना मिळाली़ त्यामुळे जनाई नगरात जाऊन त्यांचा शोध घेतला; परंतु, तो मिळून आला नाही़ दरम्यान, रामेश्वर उराडे यांनी गंगाखेड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे़ त्यावरून राम वैजनाथ पवार याच्याविरूद्ध चोरी, फसवणूक आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़ जमादार रतन सावंत या प्रकरणाचा तपास करीत आहेत़

Web Title: Parbhani: Farmer's bike driven by impersonation police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.