परभणी :पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 12:00 AM2020-01-14T00:00:58+5:302020-01-14T00:01:43+5:30

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगाव येथे आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचानक ही कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादकांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावा लागत आहे़

Parbhani: Cotton buying closed for fifteen days | परभणी :पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद

परभणी :पंधरा दिवसांपासून कापूस खरेदी बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने तालुक्यातील बाभळगाव येथे आधारभूत किमतीमध्ये कापूस खरेदी सुरुवात करण्यात आली; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचानक ही कापूस खरेदी बंद करण्यात आल्याने कापूस उत्पादकांना आपला माल खाजगी व्यापाऱ्यांकडे कवडीमोल दराने विकावा लागत आहे़
पाथरी तालुक्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध असल्याने शेतकरी नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतो़ या वर्षीच्या खरीप हंगामातही शेतकºयांनी कापूस पिकालाच प्राधान्य दिले़ जून ते सप्टेंबर महिन्यात कमी अधिक महिन्यात झालेल्या पावसावर शेतकºयांची पीकेही चांगली बहरली़ त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती; परंतु, आॅक्टोबर महिन्यात पाथरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला़ सध्या निसर्गाच्या तावडीतून सुटलेल्या पिकातून मिळालेले उत्पन्न बाजारपेठेत विक्रीसाठी येत आहे़
राज्य शासनाच्या कापूस पणन महासंघाच्या वतीने पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील जिनींगमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात आले़ बाजारातील भाव आणि हमीभाव यामध्ये मोठी तफावत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी आपला कापूस विकण्यासाठी बाभळगाव गाठू लागले; परंतु, या ठिकाणी कापूस साठविण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याने बाभळगाव येथील जिनींगवरील खरेदी केंद्र बंद करावे लागले़ त्यानंतर पणन महासंघाच्या वतीने खेडूळा येथील जिनींगवर खरेदी सुरु केली ; परंतु, याही ठिकाणी कापूस साठवण करण्यास जागा शिल्लक राहिली नाही़ बाजार समितीच्या आवारात कापसाची वाहने लावुन जिनींगवर पाठविण्या येत होती ; परंतु, पणन महासंघाच्या वतीने मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाचे कारण देवून कापूस खरेदी बंद करण्यात आली़ परिणामी आधारभूत किंमतीतील कापूस खरेदी बंद झाल्याने शेतकºयांना आपला शेतमाल खाजगी व्यापाºयांना कवडीमोल दरात विकावा लागत आहे़ त्यामुळे याकडे बाजार समिती, तालुका प्रशासन व जिल्हा प्रशासनाने लक्ष देवून बंद पडलेली कापूस खरेदी तत्काळ पणन महासंघाला सुरु करण्यासाठी आदेशित करावे, अशी मागणी तालुक्यातील कापूस उत्पादकांतून होत आहे़
ग्रेडर नाही कापूस खरेदी बंद
४पाथरी तालुक्यातील बाभळगाव व खेडूळा या ठिकाणी पणन महासंघाच्या वतीने कापूस खरेदी सुरु करण्यात आली़ राज्य शासनाने ठरवुन दिलेला ५ हजार ५५० रुपयांचा हमीभाव ही शेतकºयांना मिळू लागला; परंतु, मागील पंधरा दिवसांपासून ढगाळ वातावरणाचे कारण देत कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे़ विशेष म्हणजे मागील आठ दिवसापासून तालुक्यात कुठेही ढगाळ वातावरण दिसून आले नाही़
४कापूस उत्पादक शेतकरी दररोज बाजार समितीमध्ये कापूस खरेदी कधी सुरु केली जाणार अशी विचारणा करण्यासाठी ये-जा करीत आहेत़ मात्र बाजार समिती प्रशासन समितीकडूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही़ विशेष म्हणजे पणन महासंघाच्या वतीने बंद करण्यात आलेली कापूस खरेदीही केवळ ग्रेडर मिळत नसल्यानेच बंद आहे अशी माहिती मिळत आहे़
परभणीत मात्र कापूस खरेदी सुरू
पाथरी येथे एकीकडे ढगाळ वातावरणाच्या कारणावरून पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली असली तरी परभणीत मात्र कापूस खरेदी सुरू ठेवली आहे़ १३ जानेवारी रोजी परभणी बाजार समितीत महासंघाने प्रतिक्विंटल ५ हजार ३५० ते ५ हजार ५०० रुपये दराने कापसाची खरेदी केली़ खाजगी व्यापाºयांनी मात्र परभणी ५ हजार १०० रुपये ते ५ हजार ४३५ रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी केली़
कापूस उत्पादक शेतकºयांचा शासकीय कापूस खरेदीवर जास्त भरोसा आहे़ शेतकरी दररोज बाजार समितीकडे कापूस खरेदी केंव्हा सुरु होणार आहे, अशी विचारणा करीत आहेत़ त्यामुळे शेतकºयांची गैरसोय टाळण्यासाठी पणन महासंघाने तातडीने खरेदी केंद्र सुरु करावे़
- एकनाथ शिंदे,
उपसभापती, बाजार समिती, पाथरी़

Web Title: Parbhani: Cotton buying closed for fifteen days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.