Parbhani: Calling up to 2 crores | परभणी : २ कोटी रुपयांवर बोळवण
परभणी : २ कोटी रुपयांवर बोळवण

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): शासकीय दूध योजनेंतर्गत खरेदी केलेल्या दुधाचे सात कोटी रुपये अनुदान थकीत असताना राज्य शासनाने २ कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आहे़ अद्यापही सव्वा महिन्याचे ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुदान मिळणे बाकी आहे़ दूध खरेदीचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने शासनाच्या धोरणामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ याचा सर्वाधिक फटका पाथरी तालुक्याला बसत असल्याचे समोर येत आहे़
पाथरी तालुक्यात सुपिक जमीन असून, सुरुवातीपासून या तालुक्यात जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे प्रमुख सिंचनाचे स्त्रोत आहे़ या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उसाची शेती होऊ लागली़ या पाण्यावर वाढणाºया उसाच्या क्षेत्रामुळे आपोआपच या भागात चाराही उपलब्ध होवू लागला़ २००६ नंतर गोदावरीच्या पात्रात उच्च पातळी बंधारे बांधण्यात आले़ त्यामुळे गोदाकाठच्या क्षेत्रातही शेती सोबत शेती पूरक व्यवसायही वाढत गेला़ गोदाकाठचा शेतकरी त्यातून समृद्ध झाला़ २००५ पासून या तालुक्यात शेतकरी संकरित गायी खरेदी करून शासकीय दूध संकलन केंद्रावर दुधाचा पुरवठा करू लागला़ हळूहळू दूध संकलनात मोठी वाढ झाली़ २०१५ पासून शेतकऱ्यांचा कल दूध व्यवसायाकडे अधिक वाढला गेला़ शेतकरी बँकांकडून तसेच दूध संस्थांच्या हमीवर अर्बन बँकांकडून मोठ्या प्रमाणावर गायींची खरेदी करू लागले़ पाथरी तालुक्यात मागील तीन वर्षांत दूध व्यवसाय झपाट्याने वाढ गेला़ एकेकाळी शासकीय दूध संकलन केंद्रावर केवळ २ हजार लिटर दूध खरेदी व्हायचे, ते आता ३० हजार लिटरपर्यंत पोहोचले आहे़ त्यामुळे दूध उत्पादकांच्या हातात दररोज नगदी पैसे येत आहेत़ दूध विक्री केल्यानंतर १० दिवसांत शेतकºयांच्या हातात पैसे पडत असल्याने शेतकºयांचे व्यवहार सुरळीत चालू लागले़ मात्र मागील सहा महिन्यांपासून दुष्काळी परिस्थिती असतानाही दुधाचे अनुदान वेळेत मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला गेला़ शासकीय दूध संकलनाचे ७ कोटी रुपये थकीत अनुदान मिळविण्यासाठी दूध उत्पादक संस्थांनी आ़ मोहन फड यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावाही केला़ मात्र शासनाकडून केवळ २ कोटी रुपये जिल्ह्यासाठी उपलब्ध झाले आहेत़ त्यामुळे मागितले ७ कोटी तर मिळाले २ कोटी अशी अवस्था निर्माण झाली आहे़ शासनाच्या धोरणामुळे दूध उत्पादक शेतकºयांचे कंबरडे मोडल्याचे दिसून येत आहे़
१० दिवसांना लागते तीन लाखांचे अनुदान
च्पाथरी तालुक्यात दूध संकलन वाढत गेल्याने दूध उत्पादन संस्था मजबूत होतील, असे वाटत होते़ मात्र दीड महिन्यांचे अनुदान थकल्याने संस्था अडचणीत आल्या आहेत़
च्पशूंसाठी लागणारा चारा, पेंड, सुग्रास आणण्यासाठी संस्था मदत करू शकत नाहीत़ आणि शेतकºयांच्या हातात पैसे नाहीत, अशी दुहेरी अडचण निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे १ हजार लिटरपेक्षा अधिक प्रतिदिन दूध संकलन करणाºया संस्थेला १० दिवसांला ३ लाख रुपयांचे अनुदान वाटप करावे लागते़
च्परभणी जिल्ह्यात शासकीय दूध खरेदीमध्ये पाथरी दूध संकलन केंद्रात २७ हजार लिटर दूध संकलन होत होते़ मात्र दुष्काळ व शासनाच्या आडमुठेपणा याचा फटका दूध संकलनाला बसला असून, सध्या २१ हजार लिटरच दूध संकलन होत आहे़

शेतकरी या व्यवसायाकडे वळत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला़ शेतकºयांनी कर्ज काढून गायी खरेदी केल्या़ मात्र शासनाकडून दूध अनुदान वेळेवर मिळत नसल्यामुळे शासनच हा व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे़
-विठ्ठल गिराम, साई दूध उत्पादक संस्था, बाभळगाव

शासनाकडून वेळेत अनुदान मिळत नसल्याने शेतकºयांना पैशाची आवश्यकता असूनही रक्कम देता येत नाही़ संस्था अडचणीत सापडल्या आहेत़ असेच धोरण सुरू राहिले तर संस्थेला टाळे ठोकावे लागतील़
-एकनाथ घांडगे, जिजाऊ दूध उत्पादक संस्था, पाथरगव्हाण बु़


Web Title: Parbhani: Calling up to 2 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.