परभणी : बसचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:03 AM2020-02-24T01:03:54+5:302020-02-24T01:04:09+5:30

मोटारसायकल चालकाने बसचालकाला मारहाण केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झिरोफाटा येथे घडली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Parbhani: Bus driver killed | परभणी : बसचालकास मारहाण

परभणी : बसचालकास मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मोटारसायकल चालकाने बसचालकाला मारहाण केल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास झिरोफाटा येथे घडली आहे. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पुसद ते पंढरपूर (एम.एच.१३ सीयू ६९४०) ही बस रविवारी दुपारी पुसदहून पंढरपूरकडे जात असताना झिरोफाट्यावर एम.एच.२२ एसी ५४८२ या क्रमांकाची मोटारसायकल बससमोर उभी केली. बस पुढे नेता येत नसल्याने बसचालक श्रीहरी मुंडे यांनी मोटारसायकल बाजुला करा, अशी विनंती करुन दुचाकी चालविता येत नाही का? अशी विचारणा केली. त्यामुळे मोटारसायकल चालक व त्याच्या साथीदाराने श्रीहरी मुंडे यांना खाली खेचून मारहाण केली. हा प्रकार सुरु असताना बसमधील काही प्रवाशांनी धाव घेतली. त्यानंतर मोटारसायकल चालक तेथून पसार झाला. या प्रकरणी बसचालक श्रीहरी मुंडे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरुन सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Parbhani: Bus driver killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.