परभणी: १ हजार ४३९ ग्राहकांच्या घरांसमोर बँड वाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:14 AM2019-09-18T00:14:31+5:302019-09-18T00:15:04+5:30

महावितरणच्या परभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरासमोर १८ सप्टेंबरपासून बॅण्ड वाजवत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येणार आहे.

Parbhani: The band will be playing in front of 1,949 customers | परभणी: १ हजार ४३९ ग्राहकांच्या घरांसमोर बँड वाजणार

परभणी: १ हजार ४३९ ग्राहकांच्या घरांसमोर बँड वाजणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महावितरणच्यापरभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरासमोर १८ सप्टेंबरपासून बॅण्ड वाजवत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येणार आहे.
परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत ५८८ वीज ग्राहकांकडे ११ कोटींची थकबाकी आहे. तसेच परभणी शहरातील २५९ वीज ग्राहकांकडे ८ कोटी ५ लाख, पाथरी उपविभागांतर्गत ६५ ग्राहकांकडे १ कोटी ७३ लाख, पूर्णा उपविभागांतर्गत ७४ ग्राहकांकडे १ कोटी ४१ लाख, गंगाखेड उपविभागातील ६३ ग्राहकांकडे १ कोटी ९५ लाख, जिंतूर उपविभागांतर्गत १९८ वीज ग्राहकांकडे ४ कोटी २९ लाख, मानवत उपविभागातील ३८ वीज ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख, सेलू उपविभागातील ७८ ग्राहकांकडे १ कोटी ९२ लाख तर सोनपेठ उपविभागातील ४५ ग्राहकांकडे ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या गर्देत सापडलेल्या महावितरणने बुधवारपासून सुरु होणाऱ्या या विशेष वसुली मोहिमेत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, जनमित्र सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर पोलीस यंत्रणा सोबत असणार आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी त्वरित बिलाचा भरणा करुन वीज वितरण कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
३१ ग्राहकांकडे ७७ लाख थकले
४पालम वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांतर्गत १ लाखा पेक्षा जास्त थकबाकीदार असणारे ९ ग्राहक असून त्यांच्याकडे १२ लाख ९ हजारांची थकबाकी असून ५० हजार पेक्षा जास्त थकबाकीदार असणारे ४७ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे २९ लाख ८७ हजा रुपयांची थकबाकी राहिली आहे.
४सदरील ग्राहकांना वीज वितरण कंपनीकडून अनेक वेळा सूचना देऊनही त्यांनी देयके भरली नाहीत. परिणामी वरिष्ठांच्या आदेशानुसार सदरील ग्राहकांवर त्यांच्या घरासमोर बँड वाजवून त्यांची वीज जोडणी तोडली जाणार आहे. तसेच टप्याटप्याने थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपकार्यकारी अभियंता विवेकानंद स्वामी यांनी दिला आहे.

Web Title: Parbhani: The band will be playing in front of 1,949 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.