परभणी : १५ हजार हेक्टर जमीन आली ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:05 AM2020-01-13T00:05:57+5:302020-01-13T00:06:13+5:30

आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे.

Parbhani: 3 thousand hectares of land came under Olita | परभणी : १५ हजार हेक्टर जमीन आली ओलिताखाली

परभणी : १५ हजार हेक्टर जमीन आली ओलिताखाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसानंतर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये झालेला पाणीसाठा आणि जायकवाडी प्रकल्पाच्या कालव्यामुळे जिल्ह्यातील सुमारे १५ हजार ३२२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. याच पाण्याच्या भरोस्यावर यावर्षीच्या रबी हंगामामध्ये गहू, हरभऱ्याचे क्षेत्र दुपटीने वाढले आहे.
परभणी जिल्हा हा सुजलाम सुफलाम जिल्हा आहे. या जिल्ह्यात खरीप हंगामात मोसमी पावसाच्या पाण्यावर खरीप हंगाम घेतला जातो. तर परतीच्या पावसाने प्रकल्पांमध्ये झालेल्या जलसाठ्यावर रबी हंगामाची भिस्त असते. मागच्या काही वर्षांपासून दुष्काळाच्या दृष्टचक्रात हा जिल्हा अडकला असून त्याला यावर्षी मात्र काही प्रमाणात समाधानकारक परिस्थिती लाभली आहे. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजविला. जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने परभणी जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला. परिणामी जिल्ह्याची सिंचन क्षमता वाढली आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्पही १०० टक्के भरल्याने या प्रकल्पाचे पाणीही रबी हंगामासाठी उपलब्ध होत आहे. जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक २ कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मागच्या दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात १५ हजार ३२२ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली आहे.
जिल्ह्यामध्ये करपरा आणि मासोळी हे दोन मध्यम प्रकल्प आहेत. जिंतूर तालुक्यातील करपरा प्रकल्पाच्या पाण्यामुळे ५९७ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मासोळी मध्यम प्रकल्पाच्या पाण्यावर ३५१ हेक्टर शेत जमिनीचे सिंचन होत आहे. याशिवाय जिल्ह्यात २२ लघु प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून ७२४ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली आली आहे. त्यामध्ये ५१३ हेक्टर जमिनीवर जलाशय उपशातून सिंचन होत आहे.
१९४ हेक्टर जमिनीवर विहीर उपशाद्वारे सिंचन झाले आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पात मिळून १ हजार ६७२ हेक्टर शेत जमिनीचे सिंचन झाले आहे. यामध्ये येलदरी आणि निम्न दुधना प्रकल्पाच्या पाण्यातून होणाºया सिंचनाचे आकडे वगळले आहेत. यावर्षी सर्व गाव तलाव, विहिरी आणि मोठ्या प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी बागायती पिकांना प्राधान्य दिले आहे. त्याचाच परिणाम रबी हंगामात गव्हाची पेरणी १०५ टक्के क्षेत्रावर झाली आहे. तर हरभºयाची पेरणी १५० टक्के क्षेत्रावर झाली आहे. याशिवाय अनेक भागामध्ये ऊस लागवड करण्यात आली आहे. या सर्व पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता असते आणि त्या प्रमाणात जिल्ह्यात पाणी उपलब्ध असल्याने हे क्षेत्र वाढले आहे.
जायकवाडी कालवा : साडेपाच हजार हेक्टर जमिनीचे सिंचन
४पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाहित झाला आहे. ६ तालुक्यांमध्ये या कालव्याच्या सहाय्याने शेत जमिनीचे सिंचन होते. डिसेंबर महिन्यात रबी हंगामासाठी जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन देण्यात आले.
४ या आवर्तनाच्या सहाय्याने ६ हजार ७६७ हेक्टर शेत जमिनीचे प्रवाही सिंचन झाले आहे. तर याच कालव्यावर ४३९ हेक्टर जमिनीचे थेट मोटार लावून उपसा सिंचन करण्यात आले आहे. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात सिंचन झाले असून या विभागाने पाण्याचे दुसरे आवर्तन देण्याची तयारीही सुरु केली आहे.
विविध मार्गाने झालेले सिंचन (क्षेत्र हेक्टरमध्ये)
कालवा प्रवाही ५७६७
कालवा उपसा ४३९
नदी-नाले उपसा ३८०
विहीर उपसा ६३३७
बंधारे उपसा ६८७
मध्यम प्रकल्प ९४८
लघु प्रकल्प ७२४
एकूण: १५०८२

Web Title: Parbhani: 3 thousand hectares of land came under Olita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.