परभणी ; गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:12 AM2019-06-15T00:12:36+5:302019-06-15T00:13:09+5:30

जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.

Parbhani; 25% rain compared to last year | परभणी ; गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस

परभणी ; गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे.
मृग नक्षत्र सुरु होऊन जवळपास ८ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप मोठा पाऊस जिल्ह्यात झाला नाही. १४ जून २०१८ चा विचार करता या दिवसापर्यंत जिल्ह्यात गतवर्षी १११.३५ मि.मी. पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १४ जूनपर्यंत फक्त २२.४१ मि.मी. पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याची या दिवसापर्यंतची १२६.६१ मि.मी. पावसाची सरासरी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २५ टक्केच पाऊस झाल्याने यावर्षीही पावसाचे प्रमाण समाधानकारक राहते की नाही, या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. परिणामी बळीराजाचे आकाशाकडे डोळे लागले आहेत. गतवर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला. राज्य शासनानेही जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली आहे. या दुष्काळातून जिल्हावासिय अद्यापही सावरलेले नाहीत. अशातच पाणीटंचाईमुळे सर्व सामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जिल्ह्यातील बहुतांश लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. सिद्धेश्वर धरणात १४ जूनपर्यंत १६९.८९ दलघमी मृत पाणीसाठा आहे. तर येलदरी धरणात १२४.६७ दलघमी मृतसाठा आहे. जिवंत पाणीसाठा नसल्याने या मृतसाठ्यातूनच या धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांना पाणी द्यावे लागत आहे. याशिवाय निम्न दुधना प्रकल्पात १३ जूनपर्यंत २४२.२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीही या धरणात अत्यल्प पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे लवकर पाऊस पडावा, अशी अपेक्षा नागरिकांना वाटू लागली आहे.
२८ जूनपर्यंत : दोनच दिवस पावसाचा अंदाज
४हवामानाचा अंदाज व्यक्त करणाºया स्कायमेट या खाजगी संस्थेने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार परभणी जिल्ह्यात २८ जूनपर्यंत फक्त दोनच दिवस पाऊस पडेल, असे सांगितले आहे. त्यामध्ये १६ आणि २० जून या दोन दिवशीच काहीसा पाऊस पडेल, अन्यथा २८ जूनपर्यंत पावसाची सुताराम शक्यता नाही, असे या वेबसाईटचे म्हणणे आहे.
४स्कायमेटच्या या अंदाजामुळे जिल्हावासियांच्या घशाची कोरड वाढली आहे. त्यामुळे या संस्थेचा अंदाज खोटा ठरुन धो-धो पाऊस बरसावा, अशीच मनोमन अपेक्षा जिल्हावासियांना वाटू लागली आहे.
मानवतमध्ये सर्वाधिक पाऊस
४यावर्षी १४ जूनपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३८.९९ मि.मी. पाऊस मानवत तालुक्यात पडल्याची नोंद महसूल विभागाकडे झाली आहे. याशिवाय गंगाखेड तालुक्यात ३६.२५ मि.मी. तर पालम तालुक्यात ३२ मि.मी. पाऊस झाला आहे.
४ पूर्णा तालुक्यात २४.६० मि.मी. तर सोनपेठ तालुक्यात १८.५० मि.मी., परभणी तालुक्यात १७.१४, पाथरी तालुक्यात १६ मि.मी., जिंतूर तालुक्यात ११ मि.मी. आणि सेलू तालुक्यात फक्त ७ मि.मी. पाऊस झाल्याची महसूल विभागाकडे नोंद आहे.

Web Title: Parbhani; 25% rain compared to last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.