Parabhani: सोनपेठ आघाडीवर; मानवत पिछाडीवर; दुपारपर्यंत ३७ टक्के पेक्षा अधिक मतदान
By मारोती जुंबडे | Updated: December 2, 2025 15:55 IST2025-12-02T15:54:28+5:302025-12-02T15:55:07+5:30
या सातही नगरपालिकांत राजकीय पक्षात प्रतिष्ठेची सरळ टक्कर होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत आहे.

Parabhani: सोनपेठ आघाडीवर; मानवत पिछाडीवर; दुपारपर्यंत ३७ टक्के पेक्षा अधिक मतदान
परभणी : जिल्ह्यातील सात नगरपालिकेसाठी मंगळवारी पहाटेपासूनच मतदार केंद्राबाहेर रांगा लागल्या असून नागरिकांनी दुपारपर्यंत मतदानाचा जोर कायम ठेवला. दुपारी १.३० वाजेपर्यंत तब्बल ३७.५९ टक्के मतदानाची नोंद होत जिल्ह्याचा मतदान वेग समाधानकारक असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
पहिल्या सहा तासांत सोनपेठ नगरपरिषद मतदानात आघाडीवर राहिली असून येथे तब्बल ४३.६२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचबरोबर जिंतूरमध्ये ४२.९१, पाथरी ४१.९, तर सेलू ३६.३८, पूर्णा ३५.९ आणि गंगाखेड ३३.२ टक्के मतदान झाले आहे. मानवत नगरपालिकेत मात्र मतदानात सुस्ती दिसून आली असून दुपारपर्यंत केवळ ३२.७ टक्के मतदान झाले आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या सत्रात आणखी मतदान वेग पकडू शकते, असा अंदाज निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. वाढत्या मतदान टक्क्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली असून सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांना ‘शेवटचा तास निर्णायक’ मानत मतदारांना बाहेर काढण्यासाठी सज्ज राहण्याचे सांगितले.
या सातही नगरपालिकांत राजकीय पक्षात प्रतिष्ठेची सरळ टक्कर होत असल्याने प्रत्येक मत महत्त्वाचे ठरत आहे. काही नगरपालिकांत स्थानिक नेतृत्वाच्या थेट मुकाबल्यामुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. जिल्ह्यातील या सात रणांगणांवर मतदानाचा वेग आणि मतदारांचा उत्साह पाहता निकालाची उत्कंठा आणखी वाढू लागली आहे.