शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांना संगणकीकृत सातबारा कोणत्याही परिस्थितीमध्ये उपलब्ध झालीच पाहिजे, त्या अनुषंगाने तालुक्यात डिजीटल स्वाक्षरीच्या संगणकीकृत सातबारासाठी डाटा अपलोडची प्रक्रिया अंतिम टप्यात आहे. ...
जिंतूर तालुक्यातील कौसडी गावाला पाणीपुररवठा करणारी १६ गाव पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांमुळे महिनाभरापासूून बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. दोन विभागाच्या वादात येथील पाणीपुरवठा बंद असल्याचे समोर येत आहे. ...
मान्सून उशिराने दाखल झाल्याचा फटका जिल्हावासियांना बसला असून जून महिन्यामध्ये तब्बल ६१ मि.मी. पाऊस कमी झाला आहे. या महिन्यातील अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ५१.५ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ...
निम्न दुधना प्रकल्पातून काढलेल्या उजव्या कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे. विशेष म्हणजे, या कालव्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी फरश्या उखडल्या असून कालव्याची दुरवस्था झाल्याने या वितरिकेतून पाणी मिळेल की नाही, अशी भिती लाभार्थी शेतकरी व ...
पूर्णा तालुक्यातील निळा येथील पूरग्रस्तांच्या पूनर्वसनानंतर शिल्लक राहिलेल्या एकूण ५६ घरकुलांची बाजारभावानुसार विक्री करण्यास शासनाची परवानगी मिळाली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्राथमिक शिक्षक पदासाठी असलेल्या डी.एड. या पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी मागील अनेक वर्षांपासून पाठ फिरवली असून यावर्षी देखील हाच अनुभव येत आहे. जिल्ह्यात डी.एड. प्रवेश प्रक्रिया सुरु असून एकूण १२०० जागांसाठी केवळ १ ...
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या आणि मुख्य रस्त्यापासून गावांना जोडणाºया जोड रस्त्यांच्या कामांना गती मिळत नसल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...
खरीप पेरणीच्या तोंडावर रासायनिक खतासाठी व्यापाऱ्यांकडून शेतकºयांची लूट केली जात आहे. अनेक दुकानदारांकडे जुन्या एमआरपीचे खत शिल्लक असतानाही या खताची नवीन एमआरपी दराने सर्रास विक्री केली जात असल्याने शेतकºयांची फसवणूक केली जात आहे. ...
तालुक्यातील सिरसम (शे.) येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतीला तडे गेल्याने या धोकादायक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. या इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. ...