राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमानुसार जिल्ह्यात सुरु आलेल्या पाणीपुरवठा योजनांची खोटी माहिती या विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पंचायत राज समितीलाच दिली असून ही बनवाबनवी उघडकीस आल्याने समितीने संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चितीनंतर कठोर कारवा ...
शेत धुऱ्याच्या वादातून एका महिलेस मारहाण करुन विनयभंग केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथे २८ जून रोजी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरुन २ जुलै रोजी ५ आरोपींविरुद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
पूर्णा तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना २०११-१२ या वर्षात संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही ५२ लाख ४८ हजार ९७८ रुपयांची जादा वेतनवाढ प्रदान करण्याचा पराक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने केला असून यासंदर्भात प ...
येथील पालिका कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांचे पद रिक्त असल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अतिरिक्त पदभार दिलेले अधिकारीही कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांच्या गैरसोयीत भर पडली आहे. ...
अनेक शहरांसह शेकडो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या निम्न दुधना प्रकल्पात केवळ ५४ दलघमी पाणी शिल्लक असून हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागत आहे. ...
पावसाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी दमदार पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पाऊस पडावा, यासाठी पुर्णा तालुक्यातील कलमुला येथील महिलांनी ४ जुलै रोजी कलमुला ते चांगेफळ अशी पायी दिंडी काढली. ...
येथील शांतीदूत सेवाभावी संस्थेच्या वतीने रेल्वेस्थानकावर गेल्या १०१ दिवसांपासून मोफत पाणी वाटपासाठी सुरु केलेल्या जलयज्ञाची ३ जुलै रोजी समाप्ती झाली. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. ...
परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली़ ...
जिल्हा परिषदेला देण्यात आलेल्या निधीतील २००८-०९ व २०११-१२ या वर्षातील पाच विभागांची ३ कोटी ६८ लाख ७३ हजार १२८ रुपयांची १२ अभिलेखे लेखापरीक्षणास उपलब्ध करून देण्यात आली नाहीत़ त्यामुळे संबंधितांवर शासन निर्णयानुसार कारवाईकरून एक महिन्यात याबाबतचा अहवा ...